शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

कुरार पोलिसांची छप्परतोड कारवाई, एटीएममध्ये बोलबच्चन करत लुबाडणाऱ्या टोळीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 12:15 IST

मशीनमधून गुपचूप रक्कम काढताना साथीदार पीडिताला व्यवहार पूर्ण झाल्याचा विश्वास दाखवत त्यांची फसवणूक करायचे.    

मुंबई : नागरिकांना पैसे जमा करणे किंवा काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम केंद्रांवर जाऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीच्या चौघांना कुरार पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी छप्पर तोडून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा गाशा गुंडाळण्यात आला. त्यांनी महाराष्ट्रासह देशभरात असंख्य लोकांची फसवणूक केल्याची माहिती असून अद्याप मुंबईत घडलेल्या नऊ प्रकरणांची उकल केल्याचा पोलिसांचा दावा आहे. 

पोलिसांनी धर्मवीर किशून महतो (३२), विवेककुमार पासवान (२८), बीरलाल साह (२३) आणि किशोर महतो (२८) अशी त्यांची नावे असून टोळीचा आणखी एक सदस्य अरुण प्रसाद (२८) हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी मूळचे बिहारचे असून, त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करत त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ते पकडले न जाता देशभरात फसवणुकीच्या कारवायांमध्ये गुंतले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार लोकांना पैसे जमा करणे किंवा काढण्यात मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम केंद्रांवर जायचे. त्या टोळीचा एक सदस्य केंद्रात राहून पीडितांना मदत करण्याचा बहाणा करतो तर दुसरा घाईत असल्याचे भासवत असतो. मशीनमधून गुपचूप रक्कम काढताना साथीदार पीडिताला व्यवहार पूर्ण झाल्याचा विश्वास दाखवत त्यांची फसवणूक करायचे.    

तर  दुसऱ्या पद्धतीत नोटांचे बंडल घेऊन ग्राहक म्हणून उभे राहायचे. त्या बंडलमध्ये फक्त पुढच्या आणि मागच्या नोटा खऱ्या तर बाकीचे कोरे कागद होते. पैसे जमा करणाऱ्या पीडितांना नकळत ते बंडल दिले जायचे आणि त्या बदल्यात खऱ्या नोटा घेऊन पसार व्हायचे. लिला जेवियर (५७) या महिलेला मे महिन्यात या टोळक्याने अशाच प्रकारे ५० हजार रुपयांना लुबाडले होते. पोलिस उपायुक्त स्मिता पाटील आणि वरिष्ठ निरीक्षक सतेश गाढवे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक पंकज वानखेडे आणि पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डेटा रेकॉर्डचा वापर करत आरोपींचे भांडुपमधील ठिकाण शोधले आणि टोळीतील इतर सदस्यांची माहिती देणाऱ्या धर्मवीर महतोला अटक केली. 

गुन्ह्यांची होणार उकलअटक कारवाईदरम्यान आरोपींनी छत फोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत तिघांना पकडले, तर एक जण पळून गेला. अटक केलेल्या व्यक्तींनी त्यांच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून मुंबईसह, केरळ आणि दक्षिण भारतातील गुन्हे उघड झाले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी