शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
2
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
3
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
4
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
5
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
6
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
7
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
8
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
9
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
10
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
11
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले
12
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
13
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
14
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 
15
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
16
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
17
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
18
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
19
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
20
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे

राहायला बंगला, फिरायला थार, हातात रोलेक्स घड्याळ; 'त्या' महिला कॉन्स्टेबलला पुन्हा अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 19:46 IST

Punjab Women constable Arrested: पंजाब पोलिसांनी पुन्हा एकदा इन्स्टाक्वीन महिला कॉन्स्टेबल अमनदीप कौरला अटक करण्यात आली.

पंजाब पोलिसांनी पुन्हा एकदा इन्स्टाक्वीन महिला कॉन्स्टेबल अमनदीप कौरला अटक करण्यात आली.उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याच्या कारणावरून कॉन्स्टेबलवर कारवाई करण्यात आली. पंजाब पोलिसांच्या दक्षता पथकाने तिच्याकडून १.३५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता जप्त केली. एका कॉन्स्टेबलची इतकी संपत्ती पाहून अधिकारीही आश्चर्यचकित झाले.

पंजाब पोलिसांनी अमनदीप कौरला आधीच बडतर्फ केले. आता तिची मालमत्ता गोठवण्यात आली, ज्यात एक आलिशान बंगल्याचाही समावेश आहे, ज्याची किंमत ९९ लाख रुपये आहे. अमनदीप कौर हिचा भटिंडा येथील आणखी एका पॉश सोसायटी ड्रीम होममध्ये १२०.८३ यार्डचा प्लॉट आहे, ज्याची अंदाजे किंमत १८.१२ लाख रुपये आहे. याशिवाय, अमनदीप कौर हिच्याकडे एसयूव्ही थार पीबी ०५ एक्यू ७७२० कार आहे, ज्याची किंमत १४ लाख रुपये आहे. 

याशिवाय, बडतर्फ करण्यात आलेल्या कॉन्स्टेबलकडे रॉयल एनफील्ड मोटारसायकल, आयफोन १३ प्रो मॅक्स, आयफोन एसई, विवो मोबाईल आणि रोलेक्स घड्याळ आहे, या सर्व वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत, अशी माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे, हे सर्व सरकारी आकडे असून बाजारात त्यांची किंमत जास्त असल्याचे सांगितले जात आहे.

पोलीस वर्दीचा गैरवापर केल्याचा आरोपअमनदीप कौरला या वर्षी २ एप्रिल रोजी पंजाब पोलिसांनी १७ ग्रॅम हेरॉइनसह अटक केली होती, त्यानंतर तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले . अमनदीपवर पोलीस वर्दीचा गैरवापर आणि ड्रग्ज व्यवसाय करण्याचा आरोप करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPunjabपंजाब