मुंबई : माजी प्रेयसीसोबत फिरला म्हणून डोक्यात लोखंडी रॉड घातल्याचा प्रकार बोरीवलीत उघडकीस आला. या प्रकरणी माहिम पोलिसांनी मंगळवारी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.बोरीवलीत प्रफुल्ल चौहान (२९) राहतो. याच परिसरातील नेहावरून (नावात बदल) येथील विरल वाघेलासोबत त्याचा वाद होता. नेहा ही विरलची प्रेयसी होती. मात्र दोघांचे ब्रेकअप झाले. दरम्यान प्रफुल्लचे नेहासोबत प्रेमसंबंध जुळले. ही बाब वाघेला याला समजताच दोघांमध्ये खटके उडायला लागले. मंगळवारी रात्री प्रफुल्लने कारखाना बंद केला. कारखान्याबाहेरच प्रफुल्ल आणि त्याची मैत्रीण बोलत उभे होते. दरम्यान वाघेला तेथे आला. माझ्या गर्लफ्रेण्डसोबत का फिरतोस? असे म्हणत शिवीगाळ करू लागला. रागाने वाघेलाने त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. यात गंभीर जखमी होऊन तो बेशुद्ध पडताच वाघेला पळून गेला.
माजी प्रेयसीसोबत फिरला म्हणून डोक्यात घातला रॉड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 03:16 IST