शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी नागरिकांना चुना लावणाऱ्या रॉबिन हुड्डला गोव्यात अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 21:02 IST

राॅबीन हुड्ड उर्फ ग्रीन व्हेल असं या आरोपीचं नाव आहे. त्याने आझाद मैदान परिसरात २ परदेशी नागरिकांना फसवल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

मुंबई - मुंबई पाहण्यासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांना ठगवणाऱ्या गोव्यातील एका सराईत आरोपीला आझाद मैदान पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राॅबीन हुड्ड उर्फ ग्रीन व्हेल असं या आरोपीचं नाव आहे. त्याने आझाद मैदान परिसरात २ परदेशी नागरिकांना फसवल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून परदेशी पर्यटक फिरण्यासाठी येतात. बहुतांश परदेशी नागरिक हे आझाद मैदान, कुलाबा, मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात  फिरत असतात. त्यांच्यासाठी मुंबईही नवीनच असते. राॅबीन हा उच्चशिक्षीत असून तो इंग्रजी बोलण्यात फारच हुशार आहे. शिवाय त्याचा पेहराव देखील परदेशी नागरिकांसारखाच असतो. याच संधीचा फायदा घेऊन राॅबीन परदेशी नागरिकांना गाठायचा. आपण देखील परदेशातून आलो असून आपले पैसे संपले आहेत किंवा एकाने आपल्याला लुटलं असून परदेशातून पैसे मागवण्यासाठी मदत करा, असं म्हणत परदेशी नागरिकांना मदतीचं आवाहन करायचा, अशी होती रॉबिनची मोडस ऑपरेंडी. 

परदेशात पासपोर्टवरील नंबर शिवाय पैसे वळवले जात नाही. त्यामुळे राॅबीन ओळख झालेल्या इतर परदेशी नागरिकांच्या पासपोर्टच्या मदतीने दुसऱ्याच फसवलेल्या परदेशी नागरिकाकडूनपैसे स्वतःच्या खात्यावर वळवायचा. घेतलेले पैसे काही तासांमध्ये परत करण्याची बतावणी करून निर्जनस्थळी परदेशी नागरिकांना उभं करून तेथून फरार व्हायचा. अशा प्रकारे त्याने २०१६ मध्ये एका परदेशी नागरिकाला लाखो रूपयांना फसवलं होतं. तर ३० सप्टेंबर रोजी त्याने चीनहून आलेल्या एका वृद्ध परदेशी नागरिकाला सीएसटीएम येथे ६० हजार रुपयांना फसवलं होतं. या परदेशी नागरिकाने आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी पैसे जमा झालेल्या खात्याचा माग काढत राॅबीनला गोव्यातून अटक केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtourismपर्यटनfraudधोकेबाजी