खेळणी विक्रेत्याला चाकूच्या धाकावर लुटणारा २४ तासाच्या आत जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:57 PM2021-07-20T16:57:02+5:302021-07-20T16:57:10+5:30

Accused arrested within 24 hours : पोलिसांनी तपास करीत एका भामट्यास रोहिणखेड येथून ताब्यात घेतले आहे.

Robbery of toy seller arrested within 24 hours | खेळणी विक्रेत्याला चाकूच्या धाकावर लुटणारा २४ तासाच्या आत जेरबंद

खेळणी विक्रेत्याला चाकूच्या धाकावर लुटणारा २४ तासाच्या आत जेरबंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहरातील मुख्य रस्त्यावर खेळणी विकण्यासाठी आलेल्या विक्रेत्याला एकटे गाठल्यानंतर चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना सोमवारी दुपारी नांदुरा रोडवर घडली. या प्रकरणी पोलिसांनी सुक्ष्मपध्दतीने तपास करीत एका भामट्यास रोहिणखेड येथून ताब्यात घेतले आहे. या आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि चाकू हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
- खामगाव शहरातील विविध रस्त्यावर लहान मुलांची प्लास्टिक आणि इतर प्रकारची खेळणी विकण्यासाठी राजस्थानातून काही कुटुंब आली आहेत. खेळणी घेण्याच्या बहाण्यातून रोहिणखेड येथील मो. दानिश (२३) याने सीताराम मंगला मोंग्या(३३) रा. भवानी नगर राजस्थान याला एकटे गाठले. चाकूच्या धाक दाखवून सीताराम मोंग्या जवळील तीन दिवसांत खेळणी विकून जमा झालेले १४५०० रुपये लुटले. सोबतच एटीएम आणि एटीएमचा पिनकोड विचारून घटना स्थळावरून पसार झाला. त्यानंतर एटीएमद्वारे ३००० रुपयांची रक्कम काढली. अशाप्रकारे एकुण १७५०० रुपयांची लूट या भामट्याने केली. दरम्यान, आरोपीचे वर्णन आणि सीसी फुटेजच्या आधारे आरोपीला भल्या पहाटे  पीएसआय गौरव सराग, बोरसे, डुकरे, प्रफुल्ल टेकाडे, दीपक राठोड, गजू हिवाळे यांच्या पथकाने आरोपीस रोहिणखेड येथून ताब्यात घेतले.

Web Title: Robbery of toy seller arrested within 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.