शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस असल्याची बतावणी करत २७ लाखांची लूट, आरोपी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 02:15 IST

Crime News in Mumbai : पोलीस असल्याची बतावणी करत व्यापाऱ्याकडील २७ लाखांची रोकड़ पळवणाऱ्या दुकलीला टीपरसह नवघर पोलिसांनी जेरबंद केले आहे. कल्याण येथे ही कारवाई करण्यात आली आहे. 

मुंबई :  पोलीस असल्याची बतावणी करत व्यापाऱ्याकडील २७ लाखांची रोकड़ पळवणाऱ्या दुकलीला टीपरसह नवघर पोलिसांनी जेरबंद केले आहे. कल्याण येथे ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ मार्च रोजी रात्री नीलमनगर परिसरात जिग्नेश शहा हे विविध व्यापाऱ्यांचे पैसे घेऊन बँकेत भरण्यासाठी जात असताना, पोलीस गणवेशात असलेल्या दुकलीने त्यांना वाटेत अडवले. त्यांच्याकडील रोख रक्कम घेऊन ही दुकली पसार झाली. शहा यांनी तत्काळ नवघर पोलीस स्थानकात याविषयीची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. पोलिसांनी आरोपी खरे की खोटे, याचा शोध सुरु केला. नवघर पोलिसांसह गुन्हे शाखेनेही याचा समांतर तपास सुरु केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय दराडे,  पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नवघर पोलीस स्थानकाचे निरीक्षक (गुन्हे) संजय खेडकर यांनी तपास सुरु केला.  यावेळी तपास करताना सीसीटीव्हीच्या मदतीने संबंधित दुचाकीचा क्रमांक मिळाला. त्यावरून मोबाईल क्रमांक मिळवून आणि १४ दिवसाने तांत्रिक पुराव्याच्या मदतीने आरोपी कल्याणमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार,  गुन्ह्यातील टिपरसह तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. यात पोलिसी गणवेश घालून पोलीस असल्याची बतावणी करणारा हा खरा पोलीस नसून, एक रिक्षाचालक असल्याचे निष्पन्न झाले. या आरोपीकड़ून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात येत असून, अधिक तपास सुरू आहे. आतापर्यंत १७ लाख ३७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.  एक महिन्यापासून रेकीयात एक महिन्याआधी आरोपींनी शहा कुठे येतात, कुठे जातात याची रेकी केली. त्यानंतर पोलीस असल्याची बतावणी करत पैशांवर हात साफ केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई