शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

नवरी जोमात, नवरदेव कोमात! लग्नानंतर पैसे घेऊन नववधू व्हायची पसार, 'असा' झाला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 19:39 IST

लग्नानंतर अवघ्या काही दिवसांत दागिने आणि पैसे घेऊन नवरी पळून गेल्याने सासरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.

देशात फसवणुकीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर सासरी आलेल्या नवरीने नवरदेवालाच गंडा घातल्याची घटना घडली आहे. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांत दागिने आणि पैसे घेऊन नवरी पळून गेल्याने सासरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. पण अशाच एका टोळीचा रामपूर जिल्ह्यातील पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. 

रामपूर पोलिसांनी लुटेरी दुल्हनच्या टोळीला अटक केली आहे. रामपूर पोलिसांनी लग्नाच्या नावाखाली लुटणाऱ्या खोट्या वधूसह आठ आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटकही केली आहे. रामपूरचे पोलीस अधीक्षक अशोक कुमार शुक्ला यांनी रामपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन या टोळीचा पर्दाफाश केल्याचं सांगितलं आहे. 

पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, ही टोळी एका मुलीचे वधू म्हणून लग्न लावून द्यायचे. त्यानंतर वर आणि त्याच्या कुटुंबीयांना ब्लॅकमेल करायचे. वर पक्षाचे संपूर्ण घर लुटायचे. रामपूरचे पोलीस अधीक्षक अशोक कुमार शुक्ला यांनी सांगितले की, या टोळीने अनेक कुटुंबांची फसवणूक केली आहे. आरोपींना रिमांडवर घेऊन अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. रामपूर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

पोलीस अधीक्षक अशोक कुमार शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील किथोर पोलीस स्टेशन हद्दीतील हसनपूर गावातील रहिवासी सार्थक शर्मा आणि त्याचा मेहुणा आकाश स्वामी यांची उत्तराखंड येथील रुद्रपूरच्या लेक पार्कमध्ये एका मुलीची भेट घडवून आणली. त्यानंतर त्यांचं बनावट लग्न लावून देण्यात आलं. नंतर त्यांची 92 हजारांची फसवणूक करून त्यांना मारहाणही करण्यात आल्याचा आरोप आहे. सार्थक शर्माने याप्रकरणी गंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.  एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्न