शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

भरदिवसा गोळीबार करून व्यावसायिकास लुटले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 11:48 IST

तुझ्याकडे जे काही असेल ते काढून दे, आम्ही इथले भाई आहोत...

ठळक मुद्देभोसरीतील प्रकार : सोनसाखळीसह रोकड लंपास

पिंपरी : भरदिवसा गोळीबार करून दहशत निर्माण केली. तसेच मोबाइल ?क्सेसरी विक्रीचा व्यवसाय करणा-या व्यावसायिकाची ६० हजारांची सोनसाखळी व त्याच्या स्टॉलच्या पेटीतून दोन हजार ४५० रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेली. भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहाजवळ पुणे-नाशिक महामार्गालगत रविवारी (दि. ११) दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा भोसरी पोलीस ठाण्यात दाखल करण्या त आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी ऊर्फ सॅण्डी गुप्ता, बाबा पांडे, शिवा खरात, विकास जैसवाल व त्यांच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अक्षय अंगत भांडवलकर (वय २१, रा. बाबा लांडगे चाळ, धावडे वस्ती, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी भांडवलकर यांनी रविवारी भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहाजवळ मोबाइल अ‍ॅक्सेसरी विक्रीसाठी स्टॉल लावला होता. त्यावेळी दुपारी चारच्या सुमारास त्यांच्या ओळखीचे असलेले आरोपी गुप्ता, पांडे, खरात, जैसवाल व त्यांचा एक साथीदार एका पांढ-या रंगाच्या चारचाकीमधून तेथे आले. तुझ्याकडे जे काही असेल ते काढून दे, आम्ही इथले भाई आहोत, असे आरोपी म्हणाले. मात्र फियार्दी भांडवलकर यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपी सनी गुप्ता याने पिस्तुलाने हवेत गोळीबार केला. तसेच फियार्दी भांडवलकर यांची 20 ग्रॅम सोन्याची 60 हजारांची सोनसाखळी व स्टॉलच्या पेटीतून दोन हजार 450 रुपये जबरदस्तीने चोरून नेऊन परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आरोपी सनी गुप्ता, शिवा खरात व विकास जैसवाल यांच्यावर 2018 मध्ये दरोडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तर आरोपी बाबा पांडे बेकायदेशिर हत्यार बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. या चौघांचा तसेच त्यांच्या एका साथीदाराचा भोसरी पोलीस शोध घेत आहेत.     भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहाजवळ पुणे-नाशिक महामार्गालगत रविवारी आठवडे बाजार असतो. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. व्यावसायिक मोठ्या संख्येने येथे स्टॉल लावतात. त्यामुळे येथे बाजाराची वर्दळ असते. फियार्दी भांडवलकर यांनी स्टॉल लावला असता आरोपींनी भरदिवसा गोळीबार करून त्यांला लुटले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :bhosariभोसरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFiringगोळीबार