शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

तळेघर येथे रोडरोमिओंचा उच्छाद, विद्यार्थिनी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 00:25 IST

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर येथे रोडरोमिओंचा सुळसुळाट झाला आहे. शाळा, महाविद्यालये, तसेच बसस्थानक परिसरात मुली आणि महिलांच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत.

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर येथे रोडरोमिओंचा सुळसुळाट झाला आहे. शाळा, महाविद्यालये, तसेच बसस्थानक परिसरात मुली आणि महिलांच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. या रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये असणारे तळेघर हे गाव सामाजिक राजकीय व व्यापार, उद्योगव्यवसाय बाजारपेठ त्यातच शैक्षणिकदृष्ट्या केंद्रबिंदूचे ठिकाण असल्याने भीमाशंकर आहुपे व पाटण खोऱ्यातील हे मुख्य बाजारपेठेचे ठिकाण आहे. या भागामध्ये राहणाºया आदिवासी मुला-मुलींना हक्काचे शिक्षण मिळावे, यासाठी गेले २५ ते ३० वर्षांपूर्वी आदिवासी शिक्षण संस्था जुन्नर या संस्थेच्यावतीने तळेघर येथे शिवशंकर महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील शाळा, महाविद्यालयांच्या आवारात रोडरोमिओंनी उच्छाद घातला आहे. महाविद्यालयात येणाºया विद्यार्थिनींना, तसेच रस्त्यावरून जाणाºया महिलांच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत.या त्रासाला महिला कंटाळल्या असून या रोडरोमिओंवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.तळेघर येथे असणारे हे शिवशंकर महाविद्यालय व चिंतामणराव मोरमारे कनिष्ठ महाविद्यालय गावापासून थोडेसे दूर म्हणजे जांभोरी रोडला असल्यामुळे हे बहाद्दर शाळा भरताना व सुटताना गावामध्ये असणारे हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये महाविद्यालयाकडे जाणाºया जांभोरी फाटा चौकामध्ये जांभोरी रोड महाविद्यालयीन परिसर जुने वसतिगृह परिसर गावामधील एसटी स्टँड या भागामध्ये बिनधास्तपणे फिरकत असतात.काही तरुणांकडे दुचाकी चालविण्याचा परवाना नसतानाही चौबल सीट बसवून भरधाव वेगाने दुचाकी हाकत मुलींची छेड काढत असतात.यामुळे या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तत्काळ पावले उचलून दामिनी पथक, तसेच निर्भया पथकाची स्थापना करावी.त्याचप्रमाणे महाविद्यालय व गावामध्ये हनुमान मंदिर येथे तक्रार पेट्या बसवण्यात याव्यात. याबरोबरच रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पालकांनीकेली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे