शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

रियाने स्वतःसह तुरुंगात दुसऱ्या कैद्यांसाठी गिरवले योगाचे धडे, वकिलांनी दिली माहिती

By पूनम अपराज | Updated: October 8, 2020 21:50 IST

Sushant Singh Rajput Case : तुरुंगात टिकून राहण्यासाठी रियाने स्वतःसाठी योगाची मदत घेतली आणि तिने दुसऱ्या कैद्यांसाठीही योगाचे वर्ग घेतले असे रियाचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी सांगितले.

ठळक मुद्देमीडियाने रियाचा खूप पाठपुरावा केला होता. तुरुंगात असताना रियाने स्वत:ला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न केला, असे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, बऱ्याच वर्षांनी मी माझ्या क्लाइंटला पाहण्यासाठी तुरुंगात गेलो होते.

सुशांत राजपूत मृत्यूप्रकरणातील ड्रग्ज अँगलप्रकरणात एनसीबीने अटक केलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर भायखळ्यातील तुरुंगात राहण्याची वेळ आली होती. ती तुरुंगात २८ दिवस काढल्यानंतर अखेर काल बुधवारी भायखळा तुरुंगामधून सुटका होऊन घरी आली. मुंबई उच्च न्यायालयाने रियाला सर्शन जामीन मंजूर केला. मात्र, तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीचा जामीन अर्ज फेटाळून लावला गेला. तुरुंगात टिकून राहण्यासाठी रियाने स्वतःसाठी योगाची मदत घेतली आणि तिने दुसऱ्या कैद्यांसाठीही योगाचे वर्ग घेतले असे रियाचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी सांगितले. एनडीटीव्हीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.मीडियाने रियाचा खूप पाठपुरावा केला होता. तुरुंगात असताना रियाने स्वत:ला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न केला, असे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, बऱ्याच वर्षांनी मी माझ्या क्लाइंटला पाहण्यासाठी तुरुंगात गेलो होते. रिया कुठल्या स्थितीमध्ये आहे ते मला पाहायचे होते. मी तिला पाहिले, त्यावेळी ती हिम्मत हरलेली, डगमगलेली नव्हती. तुरुंगात ती स्वत:ची काळजी घेत होती. ती स्वत:साठी आणि इतर कैद्यांसाठी तुरुंगात योगाचे वर्ग घ्यायची. तुरुंगातल्या परिस्थितीशी तिने स्वतःला जुळवून घेतले होते. कोरोनामुळे तिला घरात बनवलेले जेवण मिळत नव्हते. सामान्य माणसाप्रमाणे ती इतर कैद्यांसोबत राहत होती. आलेल्या परिस्थितीशी तिने दोनहात केले आणि लढा दिला. तिच्यावर आरोप करणाऱ्या किंवा कोणाचाही सामना करण्यास ती आता सज्ज आहे” असे सतीश मानेशिंदे यांनी पुढे म्हटले.काल मुंबई उच्च न्यायालयाने रियाची १ लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे. रियाची सुटका करताना कोर्टाने सांगितलं आहे की, “ रियाला 10 दिवस 11ते 5 या वेळेत रियाला जवळील पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. तसेच NCB जेव्हा चौकशीसाठी बोलवले तेव्हा हजर रहावे लागले. आपला पासपोर्ट जमा करावा तसेच कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात प्रवास करु नये. मुंबईबाहेर जायचं असल्यास तपास अधिकाऱ्याला कळवावं. दोनदा झाली होती न्यायालयीन कोठडी वाढकोर्टाने रियाच्या न्यायालयीन कोठडीत दोनदा वाढ केली होती, त्यानंतर आता रियाला जामीन मंजूर झाला आहे. कनिष्ठ न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर रिया, शोविक आणि मिरांडा यांच्यासह 5 जणांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतRhea Chakrabortyरिया चक्रवर्तीadvocateवकिलjailतुरुंगYogaयोग