शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

रिया हे प्यादे! खरा मास्टरमाईंड कोण?; कंगनाचा अर्णब गोस्वामीसोबत चर्चेवेळी प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 23:14 IST

Sushant Singh Rajput सुशांत पहिल्यांदा भेटण्याआधी डिप्रेशनमध्ये नव्हता असे रिया सांगते. रियाला संशयाचा फायदा मी देऊ शकते. मलाही वाटत नाही की डिप्रेशमुळे कोणी आत्महत्या करेल, असे कंगना म्हणाली.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री कंगना राणौतने खिंड लढवत बॉलीवूडमधील टोळक्यावर अनेक आरोप प्रत्यारोप सुरु केले होते. यानंतर तिने माफियाराजवरही बोलायला सुरुवात केली होती. नेपोटिझम, इंडस्ट्रीमधील गैरधंदे आदीवर ती खुलेपणाने बोलते. आज तिने रिया चक्रवर्ती हे प्यादे असून तिच्यामागे मोठा मास्टरमाईंड असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 

सुशांत राजपूत आणि रिया चक्रवर्तीबाबत कंगनाने आज रिपब्लिक टिव्हीचा संपादक अर्णब गोस्वामीसोबत चर्चा केली. यावेळी तिने हा आरोप केला आहे. सुशांतसाठी न्याय आणि सुशांतसाठी सीबीआयच्या मागणीसाठी देश एकवटला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पण सीबीआय चौकशाचे आदेश दिले. याचबरोबर रियाने मुलाखत दिल्यानंतर तिलाही न्याय मिळावा म्हणून सोशल मिडीयावर मोहिम राबविली गेली. यावर कंगनाला विचारले असता रिया ही एक प्यादे आहे. तिला सुशांतला पैशांसाठी वापरले असेल, फिल्म मिळविण्यासाठी किंवा त्याला ड्रग देण्यासाठी. पण रियाच्या मागे कोण मास्टरमाईंड आहे, आपल्याला जाणून घ्यायला हवा, असे कंगना म्हणाली. 

रियाने सुशांतला आत्महत्येला प्रवृत्त केले किंवा हत्या केली याबाबत तुरुंगवास झाला हो वेगळा मुद्दा आहे. पण तिला हे सारे करण्यासाठी कोणी उद्यूक्त केले किंवा त्याचा उद्देश काय होता? सुशांतकडून त्याला काय हवे होते? सुशांतला त्याच्याबद्दल काही माहिती होते का? सुशांतला का मारले गेले आदी प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत असे कंगना म्हणाली. 

तसेच सुशांत पहिल्यांदा भेटण्याआधी डिप्रेशनमध्ये नव्हता असे रिया सांगते. रियाला संशयाचा फायदा मी देऊ शकते. मलाही वाटत नाही की डिप्रेशमुळे कोणी आत्महत्या करेल. जरी आपण सुशांत 2019 मध्ये डिप्रेशनमध्ये होता हे मान्य केले तरीही तो आत्महत्या का करेल?त्याची हत्या केली गेली की आत्महत्येचा बनाव रचण्यात आला? असे प्रश्न कंगनाने उपस्थित केले आहेत.  

'माझ्या ड्रिंकमध्ये तो काहीतरी मिसळवून द्यायचा', कंगना राणौतचा धक्कादायक खुलासा

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सुशांतप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर कंगनानेसुद्धा तिच्या आयुष्यातील काही गोष्टी शेअर करायला सुरुवात केली आहे. कंगनाने ट्विट करत खुलासा केला आहे की तिला कसे ड्रग्स दिले आणि इंडस्ट्रीत ड्रग्सचा वापर कसा केला जातो.   कंगना राणौतने ट्विट केले की, मी लहान होते तेव्हा माझ्या मेंटॉरने मला खूप त्रास दिला आहे. माझा मेंटॉर माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळायचा आणि ते ड्रिंक मला प्यायला द्यायचा. तो मला पोलिसांकडे जाण्यापासून सुद्धा रोखत होता.

तिने पुढे सांगितले की, मी जेव्हा चित्रपटात काम करायला सुरुवात केली तेव्हा मी मोठ्या पार्ट्यांमध्ये जायचे. यावेळी मी ड्रग्सची खूप भयावह जग पाहिले आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोकेनचा सर्वात जास्त वापर केला जातो. मी  जेव्हा पार्ट्यांमध्ये जायची तिथे हे ड्रग पार्टीमध्ये अनेकवेळा फ्री दिले जायचे. मात्र, नंतर त्यामध्ये एमडीएमएचे क्रिस्टल मिसळून दिले जावू लागले.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतarnab goswamiअर्णब गोस्वामीSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत