शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
5
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
6
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
7
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
8
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
9
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
10
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
11
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
12
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
14
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
15
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
16
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
17
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
18
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
19
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
20
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?

अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विकृताची माहिती देणाऱ्यास 25 हजारांचे बक्षीस

By पूनम अपराज | Updated: September 22, 2018 01:12 IST

नालासोपाऱ्यात चार दिवसात दोन मुलींवर अत्याचार, पोलिसांची जोरदार शोधमोहीम

वसई - मुंबई आणि ठाण्यात अल्पवयीन मुलींवर बलात्कार कऱणारा विकृत नालासोपाऱ्यात दाखल झाला आहे. चार दिवसात त्याने दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले आहे. त्याच्या माग काढण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, गुन्हे प्रकटीकरण शाखेसह पोलिसांनी अनेक पथके बनवली आहेत. पालक आणि मुलींना पोलिसांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. पोलिसांनी शाळांमध्ये मिटिंग घेऊन विद्यार्थिनी आणि शिक्षकांना सावधगिरी बाळगण्याचा सूचना दिल्या आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे गेल्या काही दिवसांपासून एका विकृत तरूण अल्पवयीन मुलींना फूस लावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत आहे. अल्पवयीन मुलींना गाठून 'तुझ्या वडिलांनी बोलावले आहे', 'तुझ्या वडिलांनी पत्र दिले आहे' अशा सबबी सांगून निर्जन ठिकाणी घेऊन जायचा. तिथे तुझ्या अंगावर किडा पडला आहे, असे सांगत कपडे काढायला सांगायचा आणि मग त्या मुलीवर बलात्कार करायचा. आता हा विकृत नालासोपारा शहरात दाखल झाला आहे. चार दिवसात या विकृताने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले आहे. मंगळवारी त्याने नालासोपारा पुर्वेच्या संखेश्वर नगर मध्ये १३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर त्याने गुरूवारी एव्हरशाईन नगर येथे अशाच पध्दतीने मुलीला फूस लावून नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला.  या 'सिरियल रेपिस्ट'ला पकडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. पिडीत मुलींनी दिलेल्या माहितीवरून त्याचे रेखाचित्रे बनविण्यात आली आहेत. मुंबई, ठाणे, आणि नवी मुंबई पोलिसांना जे सीसीटीव्ही चित्रण मिळाले होते, त्यातही हाच विकृत असल्याचे या पिडीत मुलींनी ओळखळे आहे. पोलिसांनी त्याची छायाचित्रे शहरातील विविध ठिकाणी लावली आहेत. पालकांना आणि मुलांना सावधगिरी बालगण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे नालासोपारा शहरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  या विकृताचा युध्दपातळीवर शोध सुरू असल्याची माहिती वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिली. आम्ही शाळांमध्ये जाऊन शिक्षकांना सावध केले आहे, तर शहरात या विकृताची छायाचित्रे असलेली पत्रके वाटून पालकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत. मुलींनी कुठल्याही अनोळखी व्यक्तींकडे जाऊ नये, त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नवी मुंबई पोलिसांनी या विकृताची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षिसही जाहीर केले आहे. हा विकृत ८ ते १३ वर्ष वयोगटातील अल्पवयीन मुलींना लक्ष्य करतो. त्यांना गाठून तुझ्या पालकांनी बोलावले आहे, तुझ्या बाबांनी तुला पत्र दिले आहे, असे सांगून परिसरातील एखाद्या इमारतीच्या गच्चीवर नेऊन जातो. तिथे तुझ्या अंगावर किडा पडला आहे, असे सांगून कपडे काढण्यास भाग पाडून लैंगिक अत्याचार करतो.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषण