शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! लग्न करून घरी आले नवरा-नवरी पण तितक्यात आले पोलीस अन् जेलमध्ये काढली पहिली रात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 11:58 IST

Crime News : थाटामाटात लग्न करून घरी परतलेल्या तरुणाला त्याची पहिली रात्र आता जेलमध्येच काढावी लागली आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमधील एका तरुणाला आपल्या गर्लफ्रेंडला धोका देणं चांगलंच महागात पडलं आहे. बॉयफ्रेंड लग्न करत असल्याचं समजताच तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तरुणाच्या घरी जाऊन त्याच्या लग्नाच्या दिवशीच त्याला अटक केली आहे. यामुळे थाटामाटात लग्न करून घरी परतलेल्या तरुणाला त्याची पहिली रात्र आता जेलमध्येच काढावी लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणाचे एका 20 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. 

लग्न करण्याचं वचन देत आरोपी राजकुमार तिच्यासोबत संबंध ठेवायचा. पण आता त्याने दुसऱ्याच मुलीशी लग्न केलं. यामुळे चिडलेली प्रेयसी थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचली. मध्य प्रदेशातील रीवा येथील हा प्रकार आहे. मुलीने सांगितलं की, तिला राजकुमारच्या लग्नाची माहितीही नव्हती. घडलेल्या प्रकाराची अचानक माहिती मिळताच तरुणीने पोलीस ठाणे गाठून पोलिसांत तक्रार केली. 

तरुणाने आपल्यासह जिच्याशी लग्न केलं त्या मुलीलाही फसवलं असल्याचा आरोप त्याच्या प्रेयसीने केला आहे.  प्रियकराच्या लग्नाची माहिती मिळताच तरुणीने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी वराला त्याच्या घरी पोहोचल्यानंतर अटक केली आहे. नवऱ्या मुलाला अटक करण्याचं कारण कळल्यानंतर नव्या नवरीला अक्षरशः रडू कोसळलं.

राजकुमारच्या अटकेनंतर त्याच्या घरात शांतता आहे. कालपर्यंत ज्या घरात लग्नाचा आनंद साजरा होत होता, तिथे आता शांतता आहे. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर राजकुमारला जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. या घटनेने नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्न