प्रेम जडलं अन् निकाह केला; लग्नातील सामान नेण्यासाठी गाडी आल्यानंतर नवऱ्याची झाली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 10:19 AM2021-07-27T10:19:50+5:302021-07-27T10:22:35+5:30

मुलीच्या घरच्यांनीही निकाहसाठी तयारी दाखवली. जेव्हा वऱ्हाड आलं तेव्हा मुलाचे मित्रही सहभागी झाले

Reverse Love Jihad in UP; Hindu Boy Marriage with Muslim Girl by Fraud, Police Investigate | प्रेम जडलं अन् निकाह केला; लग्नातील सामान नेण्यासाठी गाडी आल्यानंतर नवऱ्याची झाली पोलखोल

प्रेम जडलं अन् निकाह केला; लग्नातील सामान नेण्यासाठी गाडी आल्यानंतर नवऱ्याची झाली पोलखोल

Next
ठळक मुद्देमुलाने माझ्या मुलीसोबत धर्म बदलून लग्न केले, आईचा आरोपत्याने घरमालकाला मुलीचा हात मागत निकाह करण्याची परवानगी मागितली.पीडित मुलीनं कोर्टात जबाब दिल्यानंतर सत्य समोर येईल असं पोलिसांनी सांगितले

लखनऊ – उत्तर प्रदेशच्या बरेली बहेडीमध्ये रिवर्स लव्ह जिहाद(Love Jihad) चं प्रकरण समोर आलं आहे. एका मुलानं स्वत:चं नाव खोटं सांगून त्याचा धर्म लपवून एका अल्पसंख्याक मुलीसोबत निकाह केला. जेव्हा लग्नानंतर ही गोष्ट उघडकीस आली तेव्हा मुलीच्या आईनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलीनं कोर्टात जबाब दिल्यानंतर सत्य समोर येईल असं पोलिसांनी सांगितले.

पीडितांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, सहारनपूरच्या देवबंदमध्ये राहणाऱ्या कपिल राणा बरेलीने बहेडी परिसरात एका गल्लीत नाव बदलून भाड्याने रुम घेऊन राहत होता. घरमालकाला त्याने रेहान असं नाव सांगितले. याठिकाणी राहत असताना मुलाचं घरमालकाच्या मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू झालं. त्यानंतर त्याने घरमालकाला मुलीचा हात मागत निकाह करण्याची परवानगी मागितली.

मुलीच्या घरच्यांनीही निकाहसाठी तयारी दाखवली. जेव्हा वऱ्हाड आलं तेव्हा मुलाचे मित्रही सहभागी झाले. निकाहनंतर वऱ्हाड निघून गेले. परंतु त्यानंतर मुलानं पिकअप गाडी पाठवली त्यातून हुंड्याचं सामान जाणार होतं. याच गाडीतून आलेल्या दोघांनी मुलाची पोलखोल केली. त्यानंतर मुलीच्या आईनं मुलावर धर्म लपवून तिच्या मुलीसोबत निकाह केला असल्याचा आरोप करत पोलीस ठाणे गाठले.

या प्रकरणात एसपी ग्रामीण म्हणाले की, मुलीच्या आईनं मुलाविरोधात फसवणुकीचा आरोप केला आहे. मुलाने माझ्या मुलीसोबत धर्म बदलून लग्न केले. या प्रकरणी आता मुलीचा जबाब नोंदवून पुढील कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितले.

 

Web Title: Reverse Love Jihad in UP; Hindu Boy Marriage with Muslim Girl by Fraud, Police Investigate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app