शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

निवृत्त ‘IAS’ प्रविण परदेशींचं ‘फेसबुक’ हॅक; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ‘पीए’ला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 23:40 IST

सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक, फर्निचर विक्रीच्या नावाखाली दिशाभूल

योगेश पांडेनागपूर - सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचे वेगवेगळे फंडे वापरून नागरिकांना जाळ्यात ओढण्यात येत असून, काही कालावधीपासून त्यांनी ‘आयएएस’, ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांनादेखील ‘टार्गेट’ करण्यास सुरुवात केली आहे. निवृत्त ‘आयएएस’ अधिकारी प्रवीण परदेशी यांचे फेसबुक खाते ‘हॅक’ करून सायबर गुन्हेगारांनी जुने फर्निचर विक्रीच्या नावाखाली जाळे टाकले. आश्चर्याची बाब म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक त्यात अडकले व खिशातील ७५ हजार रुपये गमावले. शंका आल्याने वेळीच परदेशी यांना फोन केल्याने आणखी मोठी फसवणूक होण्यापासून वाचली. या प्रकरणात नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनायक कुलकर्णी (४५, वांद्रे, मुंबई) असे तक्रारदाराचे नाव आहे. हिवाळी अधिवेशनानिमित्ताने ते डिसेंबर महिन्यात नागपूरला होते. २२ डिसेंबर रोजी ते त्यांचे सहकारी व आयटी इंजिनिअर आलम खान यांच्यासोबत जेवण करत होते. त्यावेळी आलम खान यांच्या फेसबुक मॅसेंजरवर प्रवीण परदेशी यांच्याकडून मॅसेज आला. त्यात फर्निचरचे फोटो होते. सीआरपीएफच्या एका असिस्टंट कमांडंटची बदली झाल्याने त्याला सोफा, कपाट, एसी, सायकल, इन्व्हर्टर, डायनिंग टेबल, बेड, फ्रीज, टीव्ही, इत्यादी वस्तू केवळ १.०५ लाख रुपयांत विकायच्या असल्याचे त्यात नमूद होते. जर वस्तू विकत घ्यायच्या असतील, तर सांगावे असेदेखील मॅसेजमध्ये होते.

आलम खान यांनी व्हॉट्सॲपवर आलेला तपशील कुलकर्णी यांना पाठविला. स्वस्तात इतक्या वस्तू मिळत असल्याने कुलकर्णी यांनी त्या घेण्याची तयारी दाखविली. त्यानुसार आलम खान यांनी प्रवीण परदेशी यांच्या फेसबुक मॅसेंजरवर तसा मॅसेज दिला. काही कालावधीने कुलकर्णी यांना ७७४२३९५३८० या क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने तो सीआरपीएफमधील असिस्टंट कमांडन्ट संतोष कुमार बोलत असल्याचे सांगितले. माझे सर्व सामान भिवंडी गोडावूनमध्ये असून, तुम्ही एक लाखातच सर्व सामान घेऊ शकता, असे त्याने सांगितले. त्याच्या सांगण्यावरून कुलकर्णी यांनी त्याला यूपीआयवर ५० हजार रुपये पाठविले. त्यानंतर त्याने परत २५ हजारांची मागणी केली. अधिवेशनात व्यस्त असल्याने कुलकर्णी यांनी मुंबईत आल्यावर पैसे देतो, असे म्हटले. मात्र पॅकिंगसाठी पैसे लागतील, असे कारण दिल्याने कुलकर्णी यांनी त्याला आणखी २५ हजार रुपये पाठविले.

दोन दिवसांनी पुण्यातील नवीन घरी डिलिव्हरी करण्यास त्यांनी संतोष कुमारला सांगितले. मात्र, २४ डिसेंबरपासून त्याचा फोनच स्वीच ऑफ आला. शंका आल्याने कुलकर्णी यांनी आलम खान यांना थेट प्रवीण परदेशी यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यावेळी परदेशी यांचे फेसबुक खाते हॅक झाले असून, अज्ञात आरोपी त्यावरून फर्निचर विक्रीचे मॅसेज पाठवत असल्याची बाब समोर आली. कुलकर्णी यांनी अगोदर नॅशनल सायबर पोर्टलवर तक्रार केली. त्यानंतर सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पॅकिंगचे पाठविले होते फोटोकुलकर्णी यांना आरोपीने सीआरपीएफचा जवान गाडीतून पुण्याच्या घरी सामान घेऊन येईल, अशी बतावणी केली होती. शिवाय पैसे दिल्यावर त्याने त्यांना पॅकिंगचे फोटोदेखील पाठविले होते. प्रवीण परदेशी यांच्या फेसबुकवरून आलेला मॅसेज व सीआरपीएफचे घेतलेले नाव यामुळे कुलकर्णी यांना शंका आली नाही. याबाबत प्रवीण परदेशी यांना संपर्क केला असता, त्यांनीदेखील फेसबुक खाते हॅक झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला. त्यांनीदेखील त्याबाबत पोलिस तक्रार केली आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीcyber crimeसायबर क्राइम