शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त कमांडोंना प्रशिक्षक बनण्याची संधी; गुप्त वार्ता विभागात नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 21:46 IST

इच्छुकांना आवाहन करण्यात आले आहे 

ठळक मुद्दे शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असलेला आणि ६० वर्षाहून अधिक वय नसलेल्यांची नियुक्ती केली जाणार आहे. कमांडो प्रशिक्षक म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी सात दिवसाच्या आत विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई - राज्य गुप्त वार्ता विभागाच्या (एसआयडी) कमांडो पथकातून सेवा बजावून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा काम करण्याची संधी मिळणार आहे. एक वर्षासाठी त्यांना प्रशिक्षक म्हणून कंत्राटी पद्धतीने काम करता येणार आहे. एसआयडीने इच्छुक पात्र अधिकाऱ्यांना सहभाग होण्यासाठी आवाहन केले आहे.२६/११ च्या हल्यानंतर पोलिसांच्या सक्षमीकरणातर्गंत एसआयडीच्या कार्यकक्षा व पद्धतीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये अतिरेक्यांना प्रतिबंध करण्यासाठी अद्यावत प्रशिक्षित कमांडोचा कक्षही कार्यान्वित करण्यात आला. याठिकाणी कनिष्ठ कमांडो अधिकारी (जेसीओ) किंवा एनसीओ म्हणून सेवा निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना या विभागात पुन्हा संधी देण्याचा निर्णय गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्तांनी घेतला आहे. त्यांचा अनुभव व कौशल्याचा उपयोग नवीन अधिकाऱ्यांना घेता यावा, यासाठी तीन प्रशिक्षक पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असलेला आणि ६० वर्षाहून अधिक वय नसलेल्यांची नियुक्ती केली जाणार आहे. सुरवातीला त्यांना एक वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती दिली जाईल, त्यानंतर ते सक्षम असल्याची खात्री पटल्यास त्यांना ६५ वर्षापर्यंत नियुक्ती देण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. कमांडो प्रशिक्षक म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी सात दिवसाच्या आत विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईcommandoकमांडो