रेमडेसिविरचा काळाबाजार सुरूच; चढ्या दराने विक्री करणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 08:39 PM2021-04-21T20:39:35+5:302021-04-21T20:40:35+5:30

Remdesivir's black marketing : दोघेही वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी असून त्यांच्याकडून रेमडेसिविरची ५ इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत.

Remdesivir's black market continues; Two arrested for selling at inflated rates | रेमडेसिविरचा काळाबाजार सुरूच; चढ्या दराने विक्री करणाऱ्या दोघांना अटक

रेमडेसिविरचा काळाबाजार सुरूच; चढ्या दराने विक्री करणाऱ्या दोघांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्देमीरारोड भागात रेमडीसीवीर इंजेक्शन काळ्या बाजारात विकली जात असल्याची माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अमित काळे याना मिळाली.

मीरारोड - मीरारोडमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात तब्बल १६ हजार रुपयांना विक्री करणाऱ्या योगेश संतोष पवार (२१) रा. वांद्रे व अस्मिता नारायण पवार (२१) रा . नालासोपारा ह्या दोघांना पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या पथकाने अटक केली आहे. दोघेही वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी असून त्यांच्याकडून रेमडेसिविरची ५ इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत.

मीरारोड भागात रेमडीसीवीर इंजेक्शन काळ्या बाजारात विकली जात असल्याची माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अमित काळे याना मिळाली. काळे यांच्या पोलीस पथकाने लाईफ लाईन रुग्णालयात काम करणारी अस्मिता हिच्याकडे इंजेक्शनसाठी बनावट गिऱ्हाईक पाठवले असता तिने योगेशला सांगितले. योगेशने बोरिवलीच्या खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिलेस कळवले. एका इंजेक्शनची १६ हजार रुपये किंमत ठरवून योगेश व अस्मिताला भाईंदर उड्डाणपुला खाली असलेल्या शिधावाटप कार्यालयाजवळ पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून एकूण ५ इंजेक्शन पोलिसांनी जप्त केली आहेत.  

पोलिसांनी दोघांना अटक करून नया नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपीना ठाणे न्यायालयात हजर केले असता २४ एप्रिलपर्यंत त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे . पुढील तपास नयानगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुहेल पठाण हे करीत आहेत.  

योगेश हा महापालिकेने कंत्राटी पद्धतीने चालवण्यास दिलेल्या भाईंदरच्या प्रमोद महाजन कोविड उपचार केंद्रातील आयसीयू विभागात काम करणारा आहे. महाजन उपचार केंद्रात मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या नातलगाकडे रेमडेसिविरचे १ इंजेक्शन शिल्लक होते . ते ४ हजार ८०० रुपयांना नातलगाने त्याला विकले होते अशी माहिती त्याने पोलिसांना दिली आहे.  पोलीस बोरिवलीच्या रुग्णालयातील त्या महिलेचा शोध घेत आहेत.
 

Web Title: Remdesivir's black market continues; Two arrested for selling at inflated rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.