शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिवीरची काळ्याबाजारात पाच ते दहा हजारांना विक्री, ठाण्यातून दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 07:11 IST

Crime News : तीन हात नाका आणि बाळकूम येथे शनिवारी दोघे रेमडेसिवीरची इंजेक्शन घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार तीन हात नाका आणि बाळकूम येथे सापळा रचून दोघांना अटक केली आहे.

ठाणे : काेराेना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यभरात तुटवडा जाणवत असल्याने माेठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे खंडणीविराेधी पथकाने तीन हात नाका येथील इंटरनिटी माॅल येथे सापळा लावून एका आराेपीस रंगेहात पकडले. त्याच्याकडून १६ इंजेक्शन ताब्यात घेण्यात आली आहेत, तर बाळकूम नाका येथून आणखी एकाला पाच इंजेक्शनसह ताब्यात घेण्यात आले. आतिफ परोग अंजुम (वय २२, रा. कुर्ला, मुंबई) आणि प्रमोद ठाकूर (३१, रा. ठाकूरपाडा, भिवंडी) अशी आराेपींची नावे आहेत. ते एक इंजेक्शन ५ ते १० हजार रुपयांना विकत हाेते.तीन हात नाका आणि बाळकूम येथे शनिवारी दोघे रेमडेसिवीरची इंजेक्शन घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार तीन हात नाका आणि बाळकूम येथे सापळा रचून दोघांना अटक केली आहे.  त्या दोघांकडून पोलिसांनी २१ इंजेक्शन ताब्यात घेतल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाने दिली. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्यासह इतर प्रमुख अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींविरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९९५ चे उल्लघंन, दंडनीय कलम ७ (१) (ए) कलम १८-बी व , औषध प्रसाधन कायदा १९४० चे कलम १८ (सी) अन्वये गुन्हा नोंदविल्याची माहिती देण्यात आली.ते एक इंजेक्शन ५ ते १० हजार रुपयांना विकत हाेते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस