शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
2
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
3
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
4
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
5
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
6
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
7
पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
8
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
9
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
10
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
11
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
12
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
13
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
14
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
15
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
16
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
17
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
18
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
19
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
20
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य

खोटी पटसंख्या दाखवत कोट्यवधी रुपयांच्या निधीवर डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 04:20 IST

Thane News : योजनेचा कोड हॅक करून ज्या शाळेत अल्पसंख्याक विद्यार्थीच नाहीत, अशा शाळांमध्ये ते विद्यार्थी दाखवून कोट्यवधींची लूट काही हॅकरनी केल्याची माहिती समोर आली आहे. 

ठाणे : केंद्राच्या अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून ज्या शाळांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थी असतात, त्यांना यातून वार्षिक पैसे मिळत असतात. परंतु, या योजनेचा कोड हॅक करून ज्या शाळेत अल्पसंख्याक विद्यार्थीच नाहीत, अशा शाळांमध्ये ते विद्यार्थी दाखवून कोट्यवधींची लूट काही हॅकरनी केल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला विस्तार अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. खोटी पटसंख्या दाखवून करोडो रुपये हडपण्याचा प्रकार यातून उघड झाला आहे. त्यामुळे अशा हॅकरचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पहिली ते नववीपर्यंतच्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जात आहे. २०१७ पासून ही योजना देशभर सुरू आहे. अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या आणि खासगी अनुदानित शाळेत शिक्षण घेणाऱ्या पहिली ते नववीच्या अल्पसंख्याक विद्यार्थांना लाभ मिळतो. तिच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या खात्यात किमान दहा हजार रुपये वर्षाला जमा होतात. ठाण्यातील एका खासगी शाळेच्या नावावर या योजनेच्या अंतर्गत ५८८ मुलांची खोटी पटसंख्या दाखवून तिच्या माध्यमातून निधी हडपण्याचा प्रयत्न केला गेल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, ही बाब ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी पराडकर यांच्या लक्षात आली. त्यांनी यासंदर्भात संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली असता, त्या शाळेने अशा प्रकारच्या योजनेकरिता काहीच अर्ज केला नसल्याचे उघड झाले. या वेळी अधिक चौकशी केली असता काही अज्ञात लोकांनी या शाळेचा क्यूआर कोड हॅक करून त्या माध्यमातून ५८८ पटसंख्या दाखवून पैसे लाटण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले.  

पोलीस आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश याबाबत संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय केळकर यांच्याशी संपर्क साधून हा सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानुसार सोमवारी केळकर यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन या गंभीर प्रकाराबाबत त्यांना माहिती दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे