शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

रेखा जरे हत्या प्रकरण : बाळ बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ११ डिसेंबर रोजी होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 07:14 IST

Rekha Jare murder case: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जासंदर्भात जिल्हा न्यायालयात ११ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. 

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जासंदर्भात जिल्हा न्यायालयात ११ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी बोठे याने न्यायालयात ॲड. महेश तवले यांच्या माध्यमातून सोमवारी अर्ज केला होता. या अर्जावर मंगळवारी न्यायाधीश एम. आर. नातू यांच्यासमाेर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने जामीन अर्जावर सरकारी वकील व तपासी अधिकाऱ्यांचे म्हणणे मागविले आहे. म्हणणे आल्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. जरे यांच्या हत्याकांडात बोठे याचे नाव समाेर येताच तो नगर शहरातून पसार झाला. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पोलिसांची पाच पथके त्याचा शोध घेत आहेत. बोठे हॉटेल, लॉजमध्ये लपल्याची शक्यता गृहीत धरत पोलिसांनी गेल्या तीन दिवसांत शिर्डीसह नाशिक व इतर शहरांत शोध घेतला. मात्र, तो पोलिसांना गुंगारा देत आहे. बोठे याला कोण मदत करू शकते याचा अंदाज घेत पोलिसांनी त्याच्या मित्र व जवळच्या व्यक्तींवरही लक्ष केंद्रित केले आहे.  

लाचलुचपतमार्फत स्वतंत्र चौकशी करा : ॲड. लगड मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्याकडे असलेल्या ज्ञात, अज्ञात संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत स्वतंत्र चाैकशी करावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड यांनी मुख्यमंत्र्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे. बोठेच्या डॉक्टरेट पदवीची चौकशी करून त्याची पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर झालेली नियुक्तीही रद्द करावी, असे लगड यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय