शहरं
Join us  
Trending Stories
1
चौथा अहवाल प्राप्त झाल्यावर पारदर्शकपणे दोषींवर योग्य कारवाई केली जाईल; मुख्यमंत्र्यांचे गोरखेंना आश्वासन
2
अर्भक गायब झाले तर रुग्णालयाचे  लायसन्स रद्द करा; सर्वोच्च न्यायालय संतापले
3
युक्रेन उद्ध्वस्त केल्यानंतर आता या देशांवर हल्ला करण्याची रशियाची धमकी, युरोपियन देश चिंतीत, नाटोच्या प्रमुखांची युक्रेनमध्ये धाव  
4
केएल राहुलने सासरा सुनील शेट्टींसोबत मुंबईजवळ खरेदी केली ७ एकर जमीन; काय आहे किंमत?
5
'मी संकटात असताना सलमानचा फोन आला अन्...", महेश मांजरेकरांनी सांगितला किस्सा
6
विधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरे 'अलर्ट मोड'वर; विभागीय शिबिरातून आज नाशिकमध्ये शंखनाद 
7
"काय फालतू बॅटिंग केली ना आम्ही..."; मराठमोळा अजिंक्य रहाणे अन् श्रेयस अय्यरमधला Video व्हायरल
8
'उपचारासाठी लागणारा खर्च समोर ठेवला, घैसास यांची चूक नाही', आम्ही त्यांच्या पाठीशी, आयएमएची भूमिका
9
गुडन्यूज! सागरिका घाटगे आणि झहीर खान झाले आईबाबा, बाळाची पहिली झलक दाखवत नावही सांगितलं
10
"इथे कुंपणच शेत खातंय, सरकार आत्मचिंतन करणार का?"; जयंत पाटील यांचा महायुतीवर हल्लाबोल
11
ATM in Railway: धावत्या ट्रेनमध्ये काढता येणार पैसे, राज्यातील 'या' ट्रेनमध्ये ATM ची सुविधा
12
"मला तैमूर अन् जेहबद्दल खूप वाईट वाटतं", असं का म्हणाला इब्राहिम अली खान?
13
दुबईतील बेकरीमध्ये घुसून ३ भारतीयांवर पाकिस्तानी व्यक्तीने केला तलवारीने हल्ला; दोघांचा मृत्यू
14
क्रूरतेचा कळस! रुग्णाला फरफटत नेलं अन् बेदम मारलं; रिहॅबिलिटेशन सेंटरमधील भयंकर घटना
15
'डॉन ३'मध्ये कियाराच्या जागी दिसणार 'ही' मराठमोळी अभिनेत्री , रणवीरची 'जंगली बिल्ली' बनणार
16
देशात ९० टक्के महिला पोलीस कनिष्ठ पदावरच; २.४ लाखांपैकी केवळ ९६० आयपीएस
17
अवघ्या ११२ धावांचा पाठलाग न जमल्याने KKR चा कर्णधार अजिंक्य रहाणे निराश, म्हणाला...  
18
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹२,००,००० ची FD केली तर २ वर्षानंतर किती रक्कम मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
19
TCS कंपनीला अवघ्या ९९ पैशांत २१.१६ एकर जमीन! 'या' राज्याच्या सरकारचा मोठा निर्णय
20
मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधील स्टँडला दिलं जाणार रोहित शर्माचं नाव; आणखी २ दिग्गजांची नावेही जाहीर

रेखा जरे  हत्याकांड: प्रेम प्रकरणातून वाद; बदनामीच्या भीतीने हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 10:20 IST

Rekha Jare murder: पोलिसांनी दाखल केलेल्या पुरवणी दोषारोपपत्रात हत्येचे हेच मुख्य कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अहमदनगर : प्रेमप्रकरणातून वारंवार झालेले वाद आणि यातून होणाऱ्या बदनामीच्या भीतीतूनच बाळ बोठे याने यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची सुपारी देऊन हत्या केल्याचे अखेर पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या पुरवणी दोषारोपपत्रात हत्येचे हेच मुख्य कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी मंगळवारी पारनेर येथील प्रथम वर्ग न्यायालयात मुख्य आरोपी बाळ बोठे याच्यासह जनार्दन चंद्रप्पा, राजशेखर चाकली, पी. अनंतलक्ष्मी, व्यंकट सुब्बाचारी, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल अरिफ (सर्व  रा. हैदराबाद) व महेश तनपुरे (रा. अहमदनगर) यांच्या विरोधात ४५० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. बोठे याच्याविरोधात कट रचून हत्या करणे तर उर्वरित सहा जणांविरोधात फरार आरोपीला मदत करणे असा दोष ठेवण्यात आला आहे. 

बोठे याने ३० नोव्हेंबर २०२० रोजी सुपारी देऊन जरे यांची नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट येथे हत्या घडवून आणली होती. 

बोठे याने असा रचला कटबोठे याने सागर भिंगारदिवे याला हाताशी धरून जरे यांच्या हत्येचा कट रचला. २४ नोव्हेंबरला करंजी घाटात जरे यांच्या कारचा अपघात घडवून घातपात करण्याचे ठरले, मात्र आरोपींचा हा डाव फसला. त्यानंतर ३० नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली. बोठे याने या कामासाठी सागर उत्तम भिंगारदिवे याला सुपारी दिली. भिंगारदिवे याने हे काम आदित्य चोळके याला दिले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी