शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

चाळीत दारु पिण्यास मज्जाव केल्याने महिलेसह तिच्या पती आणि मुलास मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 16:51 IST

चाळीत दारू पिण्यास मज्जाव केल्याने महिलेस शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.

पिंपरी : चाळीत दारू पिण्यास मज्जाव केल्याने महिलेस शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. पिंपरीगावातील बालामन चाळीत गुरुवारी (दि. २१) सायंकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारुदत्त हिरामन खुडे (वय २१), आशिष गुंजेकर (वय २२), रवी इंगळे (वय २३) आणि आशिष हिवाळे (वय २२) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ४६ वर्षीय महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पिंपरीगावातील बालमन चाळीत आरोपी दारु पित बसले होते. त्यावेळी फिर्यादी महिला त्यांना म्हणाल्या, येथे वस्तीतील लोक ये जात असतात. तुम्ही येथे बसून दारू पिऊ नका, येथून निघून जा. त्यानंतर आरोपी चारुदत्त हिरामन खुडे  महिलेस म्हणाला, ही काय तुमच्या बापाची जागा आहे का? असे म्हणून चारुदत्त याने फिर्यादी महिलेस शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की करू लागला. त्यावेळी फिर्यादी महिला सोड सोड असे म्हणून ओरडली असताना त्यांचा आवाज ऐकून महिलेचा पती घरातून बाहेर आले आणि त्यांनी महिलेस सोडविण्याचा प्रयत्न केला. या वेळी आशिष गुंजेकर, रवी इंगळे आणि आशिष हिवाळे यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर फिर्यादी महिलेचा मुलगा गौरव पळत आला असता चारुदत्त याने तेथील बाटली गौरव याच्या पाठीवर मारली आणि आशिष गुजेकर याने तेथील दगड गौरव याच्या डोक्यात मारून जखमी केले. त्यानंतर फिर्यादी महिला ओरडत असताना चारुदत्त याने थांब तुला दाखवतोच, तुझा पोरगा कसा फिरतो ते पाहतोच अशी धमकी दिली. तसेच फिर्यादी महिलेचा ब्लाऊज खांद्यावर फाडून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून सर्व आरोपी तेथून पळून गेले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस