शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

जनजागृती कार्यक्रमातून दोन मुलींवरील अत्याचाराला वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 06:43 IST

बापासह चुलत्याने एका मुलीवर तर भावाने सख्ख्या बहिणीवर बलात्कार केल्याचा उलगडा एका जनजागृती कार्यक्रमात स्वत: या अल्पवयीन मुलींनी केला.

मुंबई : बापासह चुलत्याने एका मुलीवर तर भावाने सख्ख्या बहिणीवर बलात्कार केल्याचा उलगडा एका जनजागृती कार्यक्रमात स्वत: या अल्पवयीन मुलींनी केला. शिवाजीनगर विभागात चुलत्यासह बापाने आपल्या लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची, तर भावाने बहिणीवर अत्याचार केल्याची घटना कार्यक्रमात उघडकीस आली. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी बाप आणि भावाला अटक केली आहे.काही सामाजिक संस्था आणि शिवाजीनगर पोलिसांनी रफिकनगर येथील एका उर्दू शाळेत अल्पवयीन मुला-मुलींसाठी २५ डिसेंबर रोजी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी पोलीस दीदी आणि सामाजिक संस्थांच्या मार्गदर्शकांनी ठरावीक वयानंतर आपल्यात होणारे शारीरिक बदल आणि समाजात वावरताना असामाजिक तत्त्व कशाप्रकारे आपल्यावर नकळत अत्याचार करतात, याची माहिती दिली. या संदर्भातील प्रेरणादायी मार्गदर्शन मिळताच, येथे उपस्थित दोन अल्पवयीन मुलींनी संस्थांतील महिलांना आपल्यावरही गेल्या अनेक महिन्यांपासून अत्याचार होत असल्याची माहिती देत रडू लागल्या. पोलिसांनी चौकशी केली असता, एका १३ वर्षीय मुलीने आपल्यावर वडील आणि काका गेल्या वर्षभरापासून लैंगिक अत्याचार करीत असल्याचे सांगितले, तसेच दुसऱ्या १३ वर्षीय मुलीने आपल्या १६ वर्षीय भावानेसुद्धा आपल्यावर अत्याचार केला असे सांगितले.सामाजिक संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगून वडिलांसह चुलत्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी वडिलांना अटक केली असून, या प्रकरणी त्याच्यावर बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला, तर चुलत्याचा शिवाजीनगर पोलीस ठाणे शोध घेत आहे. दुसºया मुलीच्या भावाला अटक केली आहे. तो अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आल्याची माहिती या विभागाचे सहायक पोलीस आयुक्त दिनेश देसाई यांनी दिली आहे. मुंबई पोलीस गेली दोन वर्षांपासून पोलीस दीदी या कार्यक्रमातून विविध शाळांत जाऊन लहान मुलांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेत आहेत. त्यातून अशा विविध घटना उघडकीस येत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी