शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

रेव्ह पार्टी उधळली, ९५ नशेबाज ताब्यात; पाच मुलींचाही समावेश, ठाण्यात ८ लाखांचे अमली पदार्थ जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 06:13 IST

या पार्टीचे आयोजन करणारे सुजल महाजन (१८) आणि तेजस कुबल (२३) यांना अमली पदार्थाची विक्री केल्याप्रकरणी अटक केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.

ठाणे : नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाण्यात अमली पदार्थांचे सेवन करीत रेव्ह पार्टी करणारे ९० तरुण आणि पाच तरुणी यांच्या दोन गटांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. या पार्टीचे आयोजन करणारे सुजल महाजन (१८) आणि तेजस कुबल (२३) यांना अमली पदार्थाची विक्री केल्याप्रकरणी अटक केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.

इन्स्टाग्रामवर सांकेतिक भाषेचा वापर करीत सुजल आणि तेजस यांनी प्रत्येकी एक हजार रुपये आकारून घोडबंदर रोडवरील वडवली गावाजवळ खाडीकिनारी पार्टी ठरविली हाेती. पार्टीसाठी ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा रोड भागातून तरुण-तरूणी आले होते. त्याची माहिती मिळताच ठाणे पोलिसांनी मध्यरात्री ही पार्टी सुरू असतानाच छापा टाकला आणि आयोजक- सहभागी तरूणांची झिंग उतरवली. या छाप्यात २९ मोटारसायकली आणि आठ लाखांहून अधिक किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले. 

मद्यधुंद अवस्थेत थिरकताना सापडलेया पार्टीतील डीजेचे साहित्य साहित्य पोलिसांनी जप्त केले. एका ठिकाणी ५० तर दुसऱ्या ठिकाणी ४० अशा दाेन गटांत हे नशेबाज पाेलिसांना मिळाले. यातील अनेक तरुण हे नशेमध्ये मद्यधुंद अवस्थेत डीजेच्या गाण्यावर थिरकत होते. पार्टीचे आयोजन करणाऱ्या दुकलीकडून आठ लाख तीन हजार ५६० रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. 

मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदनठाण्यातील रेव्ह पार्टीवर छापा टाकून ९५ तरुणांवर कारवाई करीत नशेबाजांची रेव्ह पार्टी उधळून लावणाऱ्या ठाणे पोलिसांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले. यापूर्वी अशा पार्ट्यांवर कारवाया होत नव्हत्या, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे.

रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत या सर्व तरुणांच्या रक्ताची तपासणी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आली. त्यांच्या रक्ताचे नमुने कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

स्वागताची झिंग - नववर्ष स्वागतानिमित्ताने आयोजित पार्ट्यांत अमली पदार्थांची विक्री आणि सेवन होऊ नये, यासाठी पार्ट्यांवर नजर ठेवून कारवाईचे आदेश ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले आहेत. - वडवलीतील रेव्ह पार्टीची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्याआधारे उपायुक्त शिवराज पाटील आणि सहायक पोलिस आयुक्त नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने मध्यरात्री तीनच्या सुमारास ही पार्टी उधळून लावली.

काय मिळाले पार्टीत?अटक केलेल्या दोघांच्या ताब्यातून आठ लाख तीन हजार ५६० रुपये किमतीचे ७० ग्रॅम चरस, ४१ ग्रॅम एलएसडी, २.१० ग्रॅम एस्कॅटसी गोळ्या,  २०० ग्रॅम गांजा, बीअर- वाइन- व्हिस्की असे अमली पदार्थ, गांजा पिण्याचे साहित्य सापडले.  

या पार्टीत अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या ९५ तरुणांवर कारवाई झाली; परंतु ज्यांनी अमली पदार्थ सेवन केले नाहीत, त्यांना कलम १६९ नुसार सोडले जाईल. यापूर्वीही वडवली गावात याच आयोजकांनी दोन वेळा, तर गोव्यात एकदा पार्टीचे आयोजन केले आहे. ही त्यांची चौथी पार्टी होती.

टॅग्स :New Yearनववर्षCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थPoliceपोलिस