शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

Rashmi Shukla: फोन टॅपिंग महाराष्ट्र सरकारच्या सांगण्यावरून; रश्मी शुक्लांचा न्यायालयात मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 20:32 IST

Rashmi Shukla Phone tapping Case: डीजीपींच्या आदेशाने रश्मी शुक्ला यांनी ही कारवाई केली होती. त्या केवळ आदेशाचे पालन करत होत्या. राज्य सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांची परवानगी घेतली होती, असे वरिष्ठ वकील जेठमलानी यांनी सांगितले.

Rashmi Shukla Phone tapping Case: मुंबई: महाराष्ट्रात फोन टॅपिंग प्रकरणी राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त डॉ. रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या वकिलाने उच्च न्यायालयात मोठा दावा केला आहे. महाराष्ट्र सरकारनेच रश्मी शुक्ला यांना काही लोकांचे फोन नंबर टॅप करण्याची (Phone Tapping) परवानगी दिली होती, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले आहे. पोलिस दलातील कथित ट्रान्सफर आणि पोस्टिंगवेळच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी खऱ्या आहेत का हे तपासण्यासाठी ही परवानगी दिली होती, अशी माहिती शुक्ला यांच्यावतीने देण्यात आली आहे. (Interception of phones done with Maharashtra govt's nod: IPS officer Rashmi Shukla to Bombay High Court)

रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे कार्यरत आहेत. शुक्ला यांचे वकील महेश जेठमलानी यांनी आज उच्च न्यायालयाला सांगितले की, महाराष्ट्राच्या डीजीपी यांनी काही फोन नंबर टॅप करण्याचे आदेश दिले होते. हे नंबर राजकीय व्यक्तींशी संपर्क असलेल्या काही मध्यस्थांचे होते. ते भ्रष्टाचारात गुंतलेले होते. त्यांच्याकडून इच्छित ठिकाणी बदलीसाठी पोलीस अधिकाऱ्यांकडून मोठी रक्कम मागितली जायची. 

रश्मी शुक्ला यांच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि एन जे जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मुंबई पोलिसांनी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याविरोधात त्यांनी आव्हान दिले आहे.

रश्मी शुक्ला बळीचा बकरा...जेठमलानी यांनी सांगितले की, डीजीपींच्या आदेशाने रश्मी शुक्ला यांनी ही कारवाई केली होती. त्या केवळ आदेशाचे पालन करत होत्या. शुक्ला यांनी भारतीय़ टेलीग्राफ नियमांनुसार राज्य सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांची परवानगी घेतली होती. 17 जुलै ते 29 जुलै 2020 या काळात कुंटे यांनी याची परवानगी दिली होती. मात्र, नंतर त्यांनी सांगितले की, परवानगी मागताना चुकीची माहिती देण्यात आली. आता शुक्ला यांना बळीचा बकरा बनविले जात आहे. गुन्हे रोखण्यासाठी सबळ कारणामुळे वायरलेस संदेश टॅप करणे वैध असल्याचेही जेठमलानी यांनी न्यायालयाला सांगितले. 

टॅग्स :Rashmi Shuklaरश्मी शुक्लाHigh Courtउच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस