शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परिचिताकडून शाळकरी विदयार्थिनीवर बलात्कार, संशयित जेरबंद  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 20:54 IST

पीडितेवर लैंगिक अत्याचार करताना तिच्याकडून विरोध झाल्याने संशयिताकडून तिला मारहाणही केली तसेच तिचे डोके जमिनीवरही आपटले

मडगाव - परिचित युवकाकडून एका तेरा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीचे अपहरण होउन नंतर तिच्यावर बलात्कार करण्याची खळबळजनक घटना गोव्यात घडली असून, मायणा - कुडतरी पोलिसांनी संशयिताला जेरबंद केले आहे. पीडितेवर लैंगिक अत्याचार करताना तिच्याकडून विरोध झाल्याने संशयिताकडून तिला मारहाणही केली तसेच तिचे डोके जमिनीवरही आपटले. मेल्वीन आंतोनियो फर्र्नाडीस (२३) असे संशयिताचे नाव असून, त्याच्यविरुध्द भारतीय दंड संहितेच्या ३६३ (अपहरण) , ३७६ (बलात्कार) , ३0७ (खुनाचा प्रयत्न करणे), गोवा बाल कायदा कलम ८ व बाल संरक्षण कायदा कलम ४ अंतर्गंत गुन्हा नोंद केल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली. अधिक तपासासाठी मेल्वीनला दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. वैदयकीय तपासात पीडितेवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पीडित युवती जखमी झाल्याने सुरुवातीला तिला मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नंतर तिला गोमेकॉत हलविण्यात आले. तिची प्रकृती आता सुधारत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याच्या हददीतून बुधवारी दुपारी एका तेरा वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण झाले होते. पिडीताच्या कुटुंबियाने सर्वकडे शोधाशोध केल्यानंतर मागाहून या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदविली होती. सुरुवातीला पोलिसांनी अपहरण व गोवा बाल कायदयांतर्गंत अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंद केला होता. मात्र सांयकाळी केपेच्या आंबावली येथील डोंगरावर एक शाळकरी विदयार्थीनी जखमी अवस्थेत सापडली होती. गावकऱ्यांनी ही बाब केपे पोलिसांना कळविली नंतर यासंबधी मायणा - कुडतरी पोलिसांना माहिती देण्यात आली.पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक सेराफीन डायस व मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी घटनास्थळी भेट दिली असता, अपहरण झालेलीच ती युवती असल्याचे तसेच तिच्यावर लौंगिक अत्याचार झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट ्रझाले होते.रात्रभर पोलिसांनी संशयिताचा माग काढण्यास सुरुवात केली. अनेकांची धरपकडही केली. नंतर पोलीस संशयितापर्यंत पोहचले. कुकर्म करुन घरी लपून बसलेल्या मॅल्विन अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याला बोलते करण्याचा प्रयत्न केला असता, सुरुवातीला त्याने दाद दिली नाही. शेवटी मात्र तो पोलीस खाक्यासमोर वरमला व पोपटासारखा बोलू लागला व त्याने आपल्या गुन्हयाची कबुली दिली.मेल्वीन हा परदेशात बोटीवर कामाला होता. एका महिन्यापुर्वी तो मायदेशात आला होता. लवकरच तो पुन्हा कामावर रुजू होणार होता.संशयिताने दुचाकीवरुन त्या मुलीला आंबावली येथे नेले होते असेही तपासात उघड झाले आहे. दुचाकी जप्त करण्यात आली आहे. दुचाकीच्या डिकीमध्ये बियरच्या बाटल्याही सापडलेल्या आहेत. दुपारी शाळा सुटल्यानंतर आपण त्या युवतीचे अपहरण करुन तिला दुचाकीवरुन नेउन बलात्कार केल्याची कबुली संशयित मेल्वीनने दिली आहे. उपअधिक्षक सेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी