शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत मेक्सिकन डीजेवर बलात्कार, अनैसर्गिक कृत्य; म्युझिक इव्हेंट कंपनीच्या मालकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 21:12 IST

पीडिता मॉडेल बनण्यासाठी मुंबईत आली होती. आरोपीने पीडितेला तिचे करिअर उध्वस्त करण्याचीही धमकी दिली होती.

मुंबईमधून एक धक्कादायक बातमी येत आहे. एका मेक्सिकन महिला डीजेवर बलात्कार झाल्याचा प्रकार घडला आहे. या परदेशी महिलेचा लैंगिक छळ करणाऱ्या स्लिक एंटरटेनमेंटच्या ३६ वर्षीय मालकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. 

स्लिक एंटरटेनमेंट ही म्युझिक इव्हेंट कंपनी आहे. या आरोपीने पीडितेला तिचे करिअर उध्वस्त करण्याचीही धमकी दिली होती. आरोपीचे नाव प्रतिक पांडे असे आहे. प्रतिक हा डान्स म्युझिक कार्यक्रम आयोजित करतो. पीडित महिला ही ३१ वर्षांची आहे. पांडेचे २०२० मध्ये लग्न झालेले आहे. त्याने महिलेचे लैंगिक शोषण केले आणि तिच्याकडे मदत मागितली होती. 

पीडितेवर कोलकाता, बेंगळुरू, इंदूर आणि आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सव, टुमॉरोलँड येथे अनेक वेळा बलात्कार करण्यात आला. आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे, असे पीडितेचे वकील अरबाज पठाण यांनी सांगितले. पांडेने पीडितेच्या पुरुष मित्राला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. आरोपी तिला ओरल सेक्स करण्यास भाग पाडत असे, तसेच तिचे आक्षेपार्ह फोटो काढून अश्लील व धमकीचे संदेश पाठवत असायचा, असे वकिलांनी सांगितले. 

पीडिता मॉडेल बनण्यासाठी मुंबईत आली होती. पांडेने तिला २०१९ मध्ये पहिल्यांदा अश्लिल जोक पाठविले होते. आरोपीने काम देण्याच्या बहाण्याने वांद्र्यातील त्याच्या घरी महिलेवर पहिल्यांदा जबरदस्ती केली होती. काम देण्याच्या बदल्यात त्याने तिचा लैंगिक छळ केला होता. तसेच चालत्या ऑटोमध्ये तो तिचा हात धरायचा आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टला हात लावण्यास सांगायचा, असा आरोप पीडितेने केला आहे. 

वांद्रे पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्कार, अनैसर्गिक लैंगिक संबंध, गुन्हेगारी धमकी, लैंगिक छळ, पाठलाग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने प्रतिक पांडेला 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी