शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आजार बरा करण्याच्या नावाखाली महिलेवर अत्याचार, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 07:15 IST

जादूटोण्याने मुलाचा कर्करोग बरा करण्याच्या नावाखाली, विवाहितेवर लैंगिक अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे, याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत वर्षभर महिलेवर अत्याचार सुरू होते.

मुंबई : जादूटोण्याने मुलाचा कर्करोग बरा करण्याच्या नावाखाली, विवाहितेवर लैंगिक अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे, याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत वर्षभर महिलेवर अत्याचार सुरू होते. अखेर, या प्रकरणी शनिवारी ढोंगी बाबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चैतन्य जुहारी उर्फ चैतन्य कुमार सोनी असे आरोपीचे नाव आहे. तो सध्या उज्जैनला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार, तपास पथक उज्जैनला रवाना झाले आहे.तक्रारदार ३७ वर्षीय विवाहिता या चेंबूर परिसरात राहतात. त्यांच्या मुलावर कर्करोगाचे उपचार सुरू आहेत. मुलगा लवकर बरा व्हावा म्हणून त्यांचे सर्व बाजूने प्रयत्न सुरू असतानाच, २९ मे २०१७ रोजी त्या सोनीच्या संपर्कात आल्या. सोनीने धार्मिक विधी करून मुलाचा कर्करोग बरा होऊ शकतो, असे महिलेला सांगितले. मुलाच्या प्रेमापोटी आशेने ही महिला त्याच्या जाळ्यात अडकली. त्याने तिला भस्म खाण्यास भाग पाडले आणि विधीच्या नावाखाली महिलेवर लैंगिक अत्याचार केले.त्याच दरम्यान त्याने तिचे व्हिडीओ, फोटो काढले. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. जवळपास २ आॅक्टोबर २०१८ पर्यंत विवाहितेवर अत्याचार सुरू होते. तसेच, महिलेकडूनच पैसे उकळण्यासही त्याने सुरुवात केली.६० हजार रुपयांसह तिच्या सोन्याच्या बांगड्या त्याने काढून घेतल्या. पतीकडूनही अभिषेकाच्या नावाखाली २ लाख ९८ हजार रुपये उकळले.अखेर, सोनीचा अत्याचार वाढत असल्याने महिलेने याबाबत पतीला सांगितले. त्यानुसार, ट्रॉम्बे पोलीस ठाणे गाठून त्यांनी तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी लैंगिक अत्याचार, धमकावणे तसेच जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत शनिवारी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी