शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये मदतीसाठी आलेल्या महिलेवर बलात्कार; माजी उपनगराध्यक्ष सुनील वाघमारे यांच्यावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 14:40 IST

Rape : दिवसभर पोलीस ठाण्यात बसलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी हा रात्री अचानक पोलीस स्टेशनमधून पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या काळात अन्न धान्य घेण्यासाठी पीडित महिला सुनील वाघमारे यांच्या घरी गेली असता संधीचा फायदा घेऊन त्याने आपल्याशी गैरवर्तन करून संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

अंबरनाथ अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष  त्यांच्याविरोधात  बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबेडकर नगर परिसरातील एका महिलेनं वाघमारे यांच्यावर हा आरोप केला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वाघमारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र, दिवसभर पोलीस ठाण्यात बसलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी हा रात्री अचानक पोलीस स्टेशनमधून पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.लॉकडाऊनच्या काळात अन्न धान्य घेण्यासाठी पीडित महिला सुनील वाघमारे यांच्या घरी गेली असता संधीचा फायदा घेऊन त्याने आपल्याशी गैरवर्तन करून संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यानंतरही दोन वेळा वाघमारे याने आपल्याशी संबंध ठेवल्याचे महिलेचं म्हणणं आहे. घटनेनंतर काही दिवसांनी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार करायचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचं पीडितेने आपल्या अर्जात म्हटलं आहे. त्याचबरोबर याबाबत कुठेही वाच्यता केली तर वाघमारेने जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अखेर मंगळवारी रात्री उशिरा सुनील वाघमारे यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे दुपारपासून ही महिला तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येऊन बसली होती, त्याचवेळी आरोपी सुनील वाघमारे याला चौकशीसाठी पोलोसांनी पोलीस ठाण्यात आणून बसवलले होते. मात्र रात्री अचानक सुनील वाघमारे पोलीस स्टेशनमधून पसार झाल्याने मोठा गोंधळ उडाला. सुनील वाघमारे पोलीस ठाण्यातून कोणाला विचारून बाहेर गेला किंवा त्याला बाहेर जाण्यास कोणी मदत केली याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारambernathअंबरनाथPoliceपोलिसMuncipal Corporationनगर पालिका