शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार पीडित युवतीला गर्भपाताची परवानगी; उच्च न्यायालयाचा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 22:00 IST

Relief From High Court : गणेशपेठ पोलिसांनी ४ मे २०२१ रोेजी पीडित युवतीच्या तक्रारीवरून भिमटेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे.

ठळक मुद्दे२४ वर्षीय बलात्कार पीडित युवतीला गर्भपात करण्याची परवानगी दिली. तिच्या गर्भात १७ आठवड्याचे बाळ आहे.

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने नागपुरातील एका २४ वर्षीय बलात्कार पीडित युवतीला गर्भपात करण्याची परवानगी दिली. तिच्या गर्भात १७ आठवड्याचे बाळ आहे.

न्यायमूर्ती विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी पीडित युवतीला हा दिलासा दिला. युवतीच्या आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यासाठी तज्ज्ञांचे मंडळ स्थापन करण्यात आले होते. त्या मंडळाने न्यायालयात अहवाल सादर करून युवतीचा गर्भपात करणे शक्य असल्याचे मत दिले. त्यामुळे न्यायालयाने येत्या २१ जून रोजी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे युवतीचा गर्भपात करण्याचे निर्देश दिले. तसेच, हे बलात्काराचे प्रकरण असल्यामुळे पुराव्याकरिता बाळाचे रक्त व पेशी जतन करून ठेवण्यास सांगितले. अविनाश दोंडीराम भिमटे असे आरोपीचे नाव आहे. गणेशपेठ पोलिसांनी ४ मे २०२१ रोेजी पीडित युवतीच्या तक्रारीवरून भिमटेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. त्याला अटक करण्यात आली असून सध्या तो गजाआड आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूरsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणpregnant womanगर्भवती महिला