शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या आमिषाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2022 11:02 IST

सोमनाथ संभाजी कोदरे (वय 38, मातोश्री बिल्डिंग, केशवनगर, मुंढवा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली. पीडित तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. 

- किरण शिंदे

पुणे : दोन लग्न झाल्याचे लपवून ठेवत लग्नाचे आमिष दाखवून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदन नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ संभाजी कोदरे (वय 38, मातोश्री बिल्डिंग, केशवनगर, मुंढवा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली. पीडित तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते. पुण्याच्या सदाशिव पेठेत ती राहण्यासाठी आहे. काही दिवसांपूर्वी तिने अपना ऍपच्या माध्यमातून नोकरीसाठी अर्ज केला होता. या माध्यमातून फिर्यादीला हॉटेल रीजन्सी मधून एक फोन आला होता. तेव्हपासून आरोपी आणि फिर्यादी यांची ओळख झाली होती. आरोपीने फिर्यादीला तो हॉटेलचा मालक असल्याचे सांगून मैत्री केली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर दोघांमध्ये वारंवार शरीरसंबंध आले. 

दरम्यान, आरोपीचे आधीच दोन लग्न झालेली होती. हे लपवून त्याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवले. आणि फिर्यादी सोबत वारंवार शरीर संबंध ठेवले. एके दिवशी आरोपीचे आधीच लग्न झाले असल्याचे फिर्यादीला समजल्यानंतर तिने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. चंदन नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे