शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

फेशियलच्या नावाने ब्युटीशियनवर बलात्कार; ५० हजारांसाठी ब्लॅकमेलिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 10:25 IST

Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे ब्युटीपार्लर असून डिसेंबर २०२१ मध्ये तिची गणेश चौधरी याच्याशी इंस्टाग्रामवर ओळख झाली. त्यातून मैत्री निर्माण झाली. पुढे त्याचे रुपांतर सतत चॅटिंग व भेटीत होऊ लागले.

जळगाव : शहरातील ब्युटीशियन असलेल्या महिलेला फेशियलच्या नावाने हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून गणेश प्रकाश चौधरी (वय ४८,रा.तुळसाई नगर, जळगाव) याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे ब्युटीपार्लर असून डिसेंबर २०२१ मध्ये तिची गणेश चौधरी याच्याशी इंस्टाग्रामवर ओळख झाली. त्यातून मैत्री निर्माण झाली. पुढे त्याचे रुपांतर सतत चॅटिंग व भेटीत होऊ लागले. जानेवारी महिन्यात गणेश याने महिलेला डी मार्ट परिसरात बोलावून मोबाईल भेट दिला. त्यावेळी माझ्या नातेवाईकाचे लग्न आहे, माझे फेशियल करुन दे असे गणेश याने महिलेला सांगितले. तिने होकार दिल्यानंतर गणेश याने काव्यरत्नावली चौकाकडे बोलावले. तेथे आज फेशियल करुन दे म्हणून त्याने महिलेला तिच्याच दुचाकीवरुन भुसावळ रस्त्यावरील एका हॉटेल मध्ये नेले. तेथे आधीच गणेशच्या नावाने खोली बुक होती. तेथे फेशियल करुन दिल्यानंतर गणेश याने दोन वेळा महिलेशी जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. 

या घटनेनंतर यापुढे माझ्याशी संबंध ठेवू नको असे महिलेने त्याला बजावले, मात्र तरी देखील त्याने पुन्हा पुन्हा फोन करुन झाल्याप्रकाराची माफी मागितली. त्यानंतर महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवून पुन्हा फोनवर बोलणे सुरु केले. यानंतर फेब्रुवारी महिन्यात फोन करुन पुन्हा अबंर नील ग्राउंडवर बोलावले व त्या दिवशी त्याच हॉटेलमध्ये नेऊन दोन वेळा शारिरीक संबंध ठेवले.

असे केले ब्लॅकमेलिंग..या घटनेमुळे महिलेने गणेश याच्याशी संपर्क तोडला. अशातच २८ फेब्रुवारी रोजी त्याने दुसऱ्या क्रमांकावरुन फोन करुन माझा फोन का घेत नाही? बोलायचे नसेल तर माझा मोबाईल परत कर असे सांगितले. त्यामुळे ही महिला मोबाईल परत करण्यासाठी त्याच ग्राउंडवर गेली. तेथे त्याने आपल्यातील संबंधाचे व्हिडीओ तयार केले आहेत, तू मला ५० हजार रुपये दे नाही तर शरीरसंबंध ठेव असे सांगून पतीला व्हिडीओ दाखविण्याची धमकी दिली. यावेळी त्याने महिलेला मारहाणही केली. ३ मार्च रोजी महिलेच्या पतीला फेसबुकवर मेसेज टाकून ५० हजार रुपयांची मागणी केली. या प्रकारामुळे पतीने विचारणा केल्यावर तिने झाल्या प्रकाराची संपूर्ण माहिती दिली. त्यानुसार शनिवारी रात्री गणेश याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव