अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोन जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 12:40 PM2021-07-25T12:40:53+5:302021-07-25T12:41:01+5:30

Rape on minor girl : १६ वर्षीय मुलीस मित्राच्या रुममध्ये कोंडून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना २३ जुलै रोजी उघडकीस आली.

Rape on minor girl, two charged | अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोन जणांवर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोन जणांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : एका १६ वर्षीय मुलीस फूस लावून चिखली येथे दुचाकीवर आणत मित्राच्या रुममध्ये कोंडून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना २३ जुलै रोजी उघडकीस आली. याप्रकरणी चिखली पोलिसांनी दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलगी ही मेहकर तालुक्यातील आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींपैकी एका आरोपीने पीडित मुलीला फोन करून ''तुला तुझ्या ओळखीच्या व्यक्तीकडे माझी तक्रार करावयाची असेल तर तो चिखली येथे आहे; मी चिखली येथे जात आहे, तू माझ्या सोबत चाल'', अशी फूस लावून २३ जुलै रोजी तिला दुचाकीवर बसवून चिखली येथे आणले. दरम्यान चिखलीमधील डीपी रोडवर असलेल्या मित्राच्या रुमवर तिला नेले. तेथे सकाळी ११ ते २ वाजेच्या दरम्यान तिला रुममध्ये कोंडून तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान आरोपीचा मित्र या रुमला बाहेरून कडी लावून निघून गेला होता त्यामुळे या प्रकरणात आरोपीला अत्याचारासाठी मदत केल्याप्रकरणी त्यालाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. प्रकरणी अल्पवयीन मुलीने चिखली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून बलात्कारासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या कलमान्वये दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश शंकर महाकाळ (२५) आणि उमेश लक्ष्मण रहाटे (२३, दोघे रा. पिंपळगाव उंडा) अशी पोलिसांनी प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचीन चव्हाण, पोलिस हेड कॉन्स्टेबल राजू सुसर हे करीत आहेत.

Web Title: Rape on minor girl, two charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.