शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

फिल्मी स्टाईलने मुलीच्या भांगेत भरले कुंकू; शारीरिक संबंधानंतर केली फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 14:50 IST

Crime News : पोलिसांनी सांगितले की, दोघे कॉलेजमध्ये भेटले होते आणि त्यांचे प्रेमसंबंध होते.

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये बलात्काराची घटना समोर आली आहे. येथील एका प्रियकराने लग्नाच्या बहाण्याने प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिला सोडून पळून गेला. याप्रकरणी प्रेयसीने तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अद्याप आरोपी प्रियकराला अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी सांगितले की, दोघे कॉलेजमध्ये भेटले होते आणि त्यांचे प्रेमसंबंध होते.

आरोपी मुलाने आधी मुलीला प्रपोज केले, त्यानंतर दोघांची भेट होत होती. यादरम्यान मुलाने तिला अनेकवेळा लग्नाचे आश्वासनही दिले होते, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पीडित मुलीने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, पंडित आणि कुटुंबीयांना न जुमानता आरोपी मुलाने तिला आपल्या विश्वासात घेण्यासाठी मंदिरात जाऊन तिच्या भांगेत कुंकू भरले होते. त्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता.

याशिवाय, आरोपीने तिच्याकडे अनेकवेळा पैशांची मागणी केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. आधी 10 हजार नंतर 30 हजार मागितले. मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवून पैसेही दिले. यानंतर आरोपी तिच्यापासून दूर लांब राहण्याचा प्रयत्न करू लागला. तसेच, आरोपीने पीडितेला सांगितले की, कुटुंबाच्या विरोधात जाऊन मी लग्न करू शकत नाही. या घटनेनंतर पीडितेने पोलिसांत गुन्हा दाखल केला.

दरम्यान, डेप्युटी एसपी नबेला शुक्ला यांनी सांगितले की, पीडितेचा अर्ज आला होता. तिने एका संस्थेत शिक्षण घेतले होते. त्याठिकाणी तिची एका मुलाशी भेट झाली, त्यानंतर दोघेही प्रेमात पडले. मुलाने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि लग्नाचे खोटे आश्वासन देत राहिल्याचा आरोप मुलीने केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून भादंवि कलम 376 आणि कलम 406 च्या गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश