Rape Complaint Threatens Rape Complaint | बलात्काराच्या तक्रारीची धमकी देत मागितली खंडणी
बलात्काराच्या तक्रारीची धमकी देत मागितली खंडणी

नालासोपारा : पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या युवकाला पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन माझ्याशी लग्न कर, अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करून नोकरी घालवेन, अशी धमकी देत पैसे न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी देत महिलेने पाच लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पीडित तरुणाच्या पत्नीने शुक्रवारी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.


नालासोपारा पूर्वेकडील न्यू लिंक रोडवरील फायर ब्रिगेड कार्यालयाच्या बाजूच्या वृंदावन कॉम्प्लेक्समध्ये राहणारे गणेश माळी यांच्यासोबत आरोपी महिला जीवनकला उर्फ किरण चव्हाण हिची २०१६मध्ये ओळख झाली. २०१८ साली माळी यांची मीरा रोड येथे बदली झाल्यावर त्यांना भेटून किंवा मोबाइलद्वारे संपर्क करून अडचणी सांगत सहानुभूती मिळवली. नंतर तुम्ही तुमच्या पत्नीला घटस्फोट देऊन माझ्याशी लग्न करा, अशी मागणी करून लग्नास नकार दिला तर जीव देईन, बलात्काराची तक्रार करून तुमची नोकरी घालवेन, अशी तिने धमकी दिली.

पण गणेश माळी यांना यास नकार देताच ९ डिसेंबर रोजीसंध्याकाळी एव्हरशाइन गेटसमोरील सेलीब्रिटी हॉटेल येथे गणेश यांची पत्नी शिल्पा उर्फ शीतल हिला बोलावून ५ लाख रुपयांची खंडणी मागून त्यापैकी ५० हजार रुपये शुक्रवारी तिच्या खात्यावर जमा करून घेतले. तर उर्वरित रक्कम रात्री जमा न झाल्यास तुझ्या पतीविरोधात बलात्काराची तक्रार करीन, अशी धमकी दिली. यामुळे कंटाळून शिल्पा हिने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Web Title: Rape Complaint Threatens Rape Complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.