शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

भीक्षेकरी महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 11:33 IST

Rape News : भीक्षा देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला.

जानेफळ: मेहकर तालुक्यातील बाºडा येथे एका भीक्षेकरी महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना गुरूवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जानेफळ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, आरोपीच्या शोधात जानेफळ पोलिसांचे एक पथकही रवाना करण्यात आले आहे.जानेफळ परिसरातील एका गावात एक भीक्षेकरी महिला गेल्या काही वर्षापासून वास्तव्यास आहे. दरम्यान ही महिला नजीकच्या बाºडा गावात गुरूवारी भीक्षा मागण्यासाठी गेली होती. दुपारी एक ते दोनच्या सुमारास ती या गावात पोहोचली होती. त्यावेळी बळीराम शिवराम बाºडेकर याने भीक्षा देण्याच्या बहाण्याने तिला घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या भीक्षेकरी महिलने आरडाओरड करत घराबाहेर पळ काढला. तिच्या आवाजाने आजूबाजूच्या महिला तेथे पोहोचल्या तेव्हा पीडित महिलेने तिच्यावर बेतलेला प्रसंग कथन केला. सध्या सोयाबीन सोंगणीचा हंगाम आहे. त्यामुळे गावात वृद्धांव्यतिरिक्त फारसे अन्य व्यक्ती नसतात. नेमका याच गोष्टीचा फायदा घेत आरोपीने भीक्षेकरी महिलेवर अत्याचार केल्याची चर्चा आहे. दरम्यान, या घटनेची माहिती पीडिता ज्या गावात राहते तेथील ग्रामस्थांनाही काहींनी दिली. त्यामुळे तेथील ४० ते ५० ग्रामस्थांनी रात्री उशिरा जानेफळ पोलिस स्टेशन गाठले असून तेथे बळीराम बाºडेकर विरोधात तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान आरोपीच्या शोधासाठी जानेफळ पोलिसांचे एक पथक पाठविण्यात आले असल्याची माहिती ठाणेदार दिलीप मसराम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणाMehkarमेहकरPoliceपोलिस