शहरं
Join us  
Trending Stories
1
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
2
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
3
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
4
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
5
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
6
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
7
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
8
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
9
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
10
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
11
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
12
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
13
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
14
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
15
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
16
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
17
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
18
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
19
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
20
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी

अत्याचार करुन केली हत्या; सासू दारावर धडकताच तिचाही कापला गळा, नागपूरमधील थरारक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 05:41 IST

तो क्रूरकर्मा रात्रभर मर्डरच करत सुटला; काळरात्रीचा कुणालाच मागमूस नव्हता

- नरेश डोंगरे 

नागपूर - कितीही राग आला तरी तो तास-दोन तासानंतर शांत होतो. आप्तांचे रक्त पाहून व्यक्ती पश्चात्तापाच्या आगीत जळतो. मात्र, क्रूरकर्मा आलोक माटूरकरच्या मनात क्रोधाग्नी अशी काही भडकली होती की तो रात्रभर इकडून तिकडे मर्डरच करत सुटला. हे भयंकर आक्रित सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास उघड झाले अन् पाचपावलीतील चिमाबाईपेठमधील रहिवासी शहारले. काळरात्रीची कुणालाच कशी कल्पना आली नाही, असा सवाल ते एकमेकांना विचारू लागले. लोकमतने या परिसरातील रहिवासी, आलोकचे नातेवाईक यांना बोलते केले. पोलिसांकडूनही प्राथमिक तपासानंतरचा निष्कर्ष जाणून घेतला अन् काळीज कापणारी पार्श्वभूमी पुढे आली.

१५ वर्षांपूर्वी पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने स्वकीयांनी आलोकला बहिष्कृत केल्यासारखे केले होते. त्याची पर्वा न करता त्याने कष्टातून संसार फुलवला होता. त्याचे पत्नी विजयावर खूप प्रेम होते. मुलगा आणि मुलगी तर त्याला जीव की प्राणच वाटायचे. मेव्हणीवरही त्याचा तेवढाच जीव होता. नातेवाईकांसोबत तो सरळसाधेपणाने वागायचा. बरेच वर्षे त्याच्यासोबत आप्तांपैकी अनेक जण बोलत नव्हते. त्याची पर्वा न करता त्याने आपला व्यवसाय वाढवला.

संसारवेलही फुलविली. मुलगी परी आणि मुलगा साहिलला तो फुलासारखा जपायचा. त्याचे वागणे सरळसाधे होते. असे असताना त्याने हे आक्रित घडवलेच कसे, त्याने या सर्वांनाच एवढ्या निर्दयपणे मारलेच कसे, असे प्रश्न नातेवाईकांना पडले आहेत.नातेवाईकांच्या या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, या थरारकांडाला अनैतिक संबंध, आलोकची शरीरसंबंधाबाबतची विकृती आणि अन् त्यातून निर्माण झालेली परिस्थिती कारणीभूत असल्याचे पुढे आले.

त्याचा हस्तक्षेप अन् तिचा त्वेष

आलोकच्या लग्नाच्या वेळी त्याची मेव्हणी आमिषा केवळ ५ ते ७ वर्षांची होती. ती वयात येण्यापूर्वीपासूनच आलोककडे राहायची. या दोघांनी अनैतिक संबंधातून सर्व मर्यादा तोडल्या. मात्र, दुप्पट वयाचे भावजीसोबत ती रमणे शक्य नव्हते. तिने अनेक मित्र बनविले. त्यामुळे याचा क्रोध, हस्तक्षेप वाढत गेला. मारहाणीपर्यंत प्रकरण गेले. तो हक्क दाखवू लागल्याने ती त्वेषात आली.

अन् भडका उडाला

रविवारी रात्री ११.१५ च्या सुमारास तिने आपल्या मित्राला फोन करून त्याला आवर अन्यथा परिणाम गंभीर होतील, असे सांगून टाकले. त्यानंतर सासू आलोकच्या घरी पोहचली. तेथे त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले अन् त्याच्या संतापाचा भडका उडाला. पत्नीने त्याला आमिषाच्या जीवनात ढवळाढवळ कशाला करतो, असे विचारले अन् भडका उडाला. त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. आमिषाच याला कारणीभूत असल्याचे त्याच्या डोक्यात गेले अन् एक भयंकर घटनाक्रमाची सुरुवात झाली.

बलात्कार करून केली हत्या

आरोपी आलोक सासऱ्याच्या घरी पोहचला. त्याच्याकडे धारदार शस्त्र असल्याचे पाहून शरणागती पत्करलेल्या आमिषावर त्याने बलात्कार केला, नंतर तिचा गळा कापला. अर्धनग्न अवस्थेत आमिषाचा मृतदेह सोडून तो निघण्याच्या तयारीत असतानाच सासू बाहेरून दारावर धडकली. त्यामुळे त्याने सासूचीही गळा कापून हत्या केली.

क्रूरकर्मा घरी परतला

मध्यरात्रीनंतर त्याने पत्नीसोबत जबरदस्तीने शय्यासोबत करण्याचा प्रयत्न केला. रक्ताने माखलेले कपडे बघून तिने नकार दिल्यामुळे, त्याने विजयाचा धारदार शस्त्राने गळा चिरला. तिने किंकाळी फोडल्याने मुले जागी झाली. परीने विरोध केला असावा. त्यामुळे त्याने तिचे हातपाय बांधले. तरीदेखील तिचा विरोध सुरू असल्यामुळे डोक्यावर हातोडा हाणून तिलाही रक्ताच्या थारोळ्यात लोळविले आणि आता मुलालाच कशाला ठेवायचे म्हणून त्याने त्याच्या तोंडावर उशी दाबून त्यालाही संपविले. पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे आणि प्राथमिक तपासावरून हा निष्कर्ष काढला आहे.

ते आले अन् ...

सुमारे ५० वर्षे जुन्या नारायणराव निमजे चाळीत वृद्ध देवीदास बोबडे दुसऱ्या माळ्यावर एका छोट्याशा खोलीत भाड्याने राहतात. बाजूला राऊत आणि अन्य एक परिवार तर खाली निमजे परिवार राहतो. बोबडे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. रविवारी रात्री ते कामावर निघून गेले. पोलिसांच्या मते, त्यांना दारूचे भारी व्यसन आहे. सकाळी ११.३० च्या सुमारास टुन्न होऊन ते घरात शिरले. पत्नी आणि मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडून असतानादेखील त्यांचे त्याकडे लक्ष गेले नाही. पोलीस घरी आल्यानंतर त्यांची नशा उतरली.

आमिषाने केली मृत्यूपूर्वी रेकॉर्डिंग

 आलोक घरात शिरताच आमिषाने तिच्या मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग ॲप सुरू केले. त्यामुळे आमिषावर बलात्कार करण्यापूर्वी  तसेच नंतर आरोपीने तिच्याशी घातलेला वाद, त्यानंतर तिची आणि तिच्या आईची केलेली हत्या आणि या संपूर्ण घटनाक्रमात दरम्यान झालेले या तिघांमधील वाद, किंकाळ्याआमिषाच्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड झालेले आहे. हे रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले आहे.

आधीच रचले होते कट-कारस्थान

आलोकने या हत्याकांडाचे कट-कारस्थान आधीच रचले होते, याची पुष्टी देणारा महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती मध्यरात्री लागला. आरोपी आलोकने ऑनलाइन पोर्टलवरून चाकूचा एक सेट मागवला होता. यात विविध प्रकारचे चाकू होते. त्याने घरगुती वापर करायचा आहे, असे सांगून आपल्या मुलीच्या नावावर हा चाकूचा सेट मागविला होता. तीन दिवसापूर्वीच त्याची डिलिव्हरी त्याला झाली होती, असेही स्पष्ट झाले असून या सेट मधील एक धारदार चाकू त्याने पत्नी, मेहुणी आणि सासूचा गळा कापण्यासाठी वापरल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळnagpurनागपूरPoliceपोलिस