कानपूर - उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये एका सहा वर्षांच्या मुलीच्या झालेल्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याने आपल्या पुतण्याकरवी एका मुलीची हत्या करवली होती. या दाम्पत्याला लग्नाला २० वर्षे लोटून गेल्यानंतरही कुठलेही मुलबाळ नव्हते. त्यामुळे त्यांनी आपल्या पुतण्याला एका मुलीची हत्या करून त्याचे यकृत देण्यास सांगितले होते.दरम्यान, या तरुणाने आपल्या एका मित्रासोबत मिळून एका सहा वर्षीय मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या केली. नंतर चाकूने तिचे पोट फाडून यकृत बाहेर काढले आणि काकीला आणून दिले. नंतर या दाम्पत्याने अल्पवयीन मुलीचे लिव्ह खाल्ले तसेच तिच्या शरीराच्या अन्य अवयवांची विल्हेवाट लावली. या घटनेची माहिती मिळताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दखल घेतली होती.कानपूरमधील घाटमपूर पोलिस ठाणे क्षेत्रातील भदरस गावामध्ये दिवाळीच्या संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एक ६ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची चर्चा सुरू झाली. दिवाळीच्या पूजेवेळीच मुलगी बेपत्ता असल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर कुटुंबीयांसह शेजाऱ्या पाजाऱ्यांसह इतरांनी या मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र तिचा शोध लागला नाही. अखेरीस रविवारी मुलीचा मृतदेह शेतात सापडला. मुलीच्या शरीरातील अनेक अवयव काढलेले होते. तसेच तिच्या हात आणि पायांना लाल रंग लागलेला होता.दरम्यान, ग्रामीण विभागाचे एसपी बृजेश श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी मृत मुलीच्या शेजारी राहणाऱ्या अंकुल कुरील आणि वीरन कुरील यांना पोलिसांनी अटक केली आहे. अंकुलचा काका परशुराम याने हे कृत्य घडवून आणण्यासाठी वीरन आणि अंकुल यांना पैसे दिले होते. अंकुल आणि वीरन यांनी हे कृत्य करण्यापूर्वी मद्यप्राशन केले होते. या मुलीवर बलात्कार केल्यानंतर अंकुलने तिचे यकृत काढले आणि ते परशुराम याला दिले होते.एसपींनी सांगितले की, परशुराम याचा विवाह १९९९ मध्ये झाला होता. मात्र त्याला अद्याप मुलबाळ होत नव्हते. त्यामुले परशुराम याने अंकुल आणि वीरन यांना पैसे देऊन हे कृत्य घडवून आणले. पोलिसांनी परशुराम आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. आता दोघांचीही चौकशी सुरू आहे. तर अंकुल आमि वीरन यांची पाठवणी तुरुंगात करण्यात आली आहे.
क्रौर्याची परिसिमा! सहा वर्षांच्या मुलीची बलात्कार करून केली हत्या, पोट फाडून खाल्लं यकृत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 10:10 AM