शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराचा आरोपी पोलिसांच्या तावडीतून सुटला, पीडितेच्या घरी पोहोचला अन्...पुढे जे काही घडलं त्यानं एकच खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 16:42 IST

राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे एका बलात्कार प्रकरणातील आरोपीनं चक्क पोलिसांच्या तावडीतून पळ काढला आणि पुढे त्यानं जे काही केलं त्यानं पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे एका बलात्कार प्रकरणातील आरोपीनं चक्क पोलिसांच्या तावडीतून पळ काढला आणि पुढे त्यानं जे काही केलं त्यानं पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्याचं झालं असं की आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला आणि थेट पीडितेच्या घरी पोहोचला. तिथं जाऊन जवळच्या एका झाडावर गळफास घेऊन त्यानं आत्महत्या केली आहे. 

आरोपीच्या कुटुंबीयांना ही बाब कळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. कुटुंबीयांकडून बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात होती. लोकांचा वाढता गोंधळ पाहून पोलिसांनी शवविच्छेदन गृहाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. माहिती मिळताच अनेक पोलीस अधिकारीही घटनास्थळावर पोहोचले आहेत.

एका पोलिसाचं निलंबनया घटनेनंतर एका पोलिसाला निलंबित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर तरुणाचे गेल्या पाच वर्षांपासून या तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचीही चर्चा आहे. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न दुसऱ्याशी लावलं. पण लग्नानंतरही दोघांची भेट होत राहिली. मुलीच्या सासरच्या लोकांनी पोलिस ठाण्यात मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.

मुलाच्या कुटुंबीयांचा संतापत्याचवेळी जिल्ह्यातील बडे अधिकारी या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्याला या प्रकरणाचा निःपक्षपातीपणे तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोबतच या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहितीही मागवण्यात आली आहे. या घटनेनंतर आरोपी तरुणाच्या बाजूनं असणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर पीडितेच्या बाजूनं कोणीही प्रतिक्रिया देण्यास तयार झालेलं नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थान