शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई टाळण्यासाठी खंडणी उकळणारा अटकेत; दहा लाखांची केली होती मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 11:41 IST

मालमत्ता गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांच्या पथकाने १९ फेब्रुवारी रोजी यातील उमेशला अटक केली. यातील अन्य दोघांचाही शोध सुरु आहे.

ठाणे- अनधिकृत बांधकामावरील कारवाई टाळण्यासाठी तीन लाख ६० हजारांची खंडणी उकळणाऱ्या त्रिकुटापैकी उमेश यादव (रा. साठेनगर, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाने शनिवारी अटक केली. त्याची ठाणे न्यायालयाने जामिनावर सुटका केली.वागळे इस्टेट रोड क्रमांक ३३ येथे ठाणे जनता सहकारी बँकेच्या पाठीमागे अंकिता इंडस्ट्रिज ही अभिनंदन दोशी (५५) ची कंपनी आहे. १९ एप्रिल २०२१ ते १७ नाव्हेंबर २०२१ या काळात चंद्रभूषण विश्वकर्मा, उमेश यादव आणि अन्य एक अनोळखी व्यक्ती यांनी दोशी यांना त्यांच्या कंपनीच्या आवारातील झाड कापल्याबाबत तसेच बेकायदेशीरपणे बांधकाम केल्याची तक्रार करून त्यावर कारवाई होऊ नये यासाठी एक व्हिडिओ बनविला. तो प्रसारित करून दोशी यांच्याकडे त्यांनी दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्यापैकी तीन लाख ६० हजारांची रक्कम रोख आणि गुगल पेच्या माध्यमातून त्यांनी स्वीकारून त्यांचा छळ करून नाहक बदनामी केली.

याप्रकरणी कथित पत्रकार चंद्रभूषण विश्वकर्मा, उमेश यादव यांच्यासह तिघांविरुद्ध १० फेब्रुवारी रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. मालमत्ता गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांच्या पथकाने १९ फेब्रुवारी रोजी यातील उमेशला अटक केली. यातील अन्य दोघांचाही शोध सुरु आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसthaneठाणे