शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

परळीत दरोडा टाकण्यापूर्वीच चौघे जेरबंद;परळी ग्रामीण पोलिसांनी जीपसह शस्त्र केले जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 18:26 IST

दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या टोळीला परळी ग्रामीण पोलिसांनी सापळा लावत घेरले. ९ पैकी चौघे जेरबंद केले, तर ५ जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

बीड : दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या टोळीला परळी ग्रामीण पोलिसांनी सापळा लावत घेरले. ९ पैकी चौघे जेरबंद केले, तर ५ जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले. शनिवारी रात्री अंबाजोगाई - अहमदपूर मार्गावर हा प्रकार घडला. ताब्यातील चौघांकडून जीपसह धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहे. परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

गोविंद सौदागर गीते, संभाजी लिंबाजी कांबळे, दत्ता मोहन गीते, शंकर नरसिंह गायकवाड [रा. तळणी, ता. परळी] अशी पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. हे चौघेही एका जीपमधून (एमएच २० बीवाय ५२३५) परळीकडे आले. त्यानंतर ते अंबाजोगाई - अहमदपूर मार्गावरील परळीपासून २० किमी अंतरावरील ढाब्यावर थांबले. काहीजण जीपमध्ये बसलेले होते, तर काही जण बाजूलाच दरोडा टाकण्याचा प्लॅन आखत होते. हा प्रकार अंबाजोगाईचे अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे यांना समजला. त्यांनी तात्काळ परळी ग्रामीण ठाण्याचे पो. नि. सुरेश चाटे यांना माहिती दिली.

प्रकरणाचे गांभीर्य ओळखत चाटे पथकासह रवाना झाले. ढाब्याच्या बाजूने सापळा लावला. खात्री पटताच त्यांनी झडप घातली. परंतु बाहेर उभ्या असलेल्या एका दरोडेखोराचे पोलिसांकडे लक्ष गेले. अंधाराचा फायदा घेत त्यांनी धूम ठोकली. जीपमधील चौघे मात्र पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर रात्रभर पोलिसांनी शोध मोहीम राबविली. परंतु इतर पाच जण हाती लागले नाहीत.

दरम्यान, जीपची झडती घेतली असता दोन कु-हाडी, हॉकी स्टिक, सत्तूर, खंजीर, चटणी, दोरी, टांबी, काठ्या असे साहित्य आढळून आले. हे सर्व जप्त करुन परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात चाटे यांच्या फिर्यादीवरुन नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. सुरेश चाटे, पो. उप नि. विकास आडे, विष्णू घुगे, जीवराज हंगे, राजाराम राऊत, सुदर्शन एकुलवार, अमोल मुंडे, व्यंकट सोरमारे, विठ्ठल मदने यांनी केली.

टॅग्स :Crimeगुन्हाBeed policeबीड पोलीसRobberyदरोडा