शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चाकणमध्ये शाळेकडे खंडणीची मागणी; मनसेच्या पदाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 22:49 IST

पोलिसांनी केले गजाआड

चाकण:  चाकण येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेने लॉकडॉउनमध्ये जास्त फी का आकारली ? याप्रकरणी शाळेची बदनामी टाळण्यासाठी व आंदोलन न करण्यासाठी एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. त्या बदल्यात दोन टप्प्यात त्यांनी काही रक्कम वसूल देखील केले. उर्वरित रक्कम न दिल्यास शाळेची बदनामीची धमकी देणाऱ्या मनसेच्या जिल्हा संघटकाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.

अभय अरुण वाडेकर ( राहणार चाकण,  तालुका खेड जिल्हा पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्हा संघटकाचे नाव आहे.  याप्रकरणी महेंद्र इंद्रनील सिंग ( वय ५१, राहणार इंद्रायणी नगर, भोसरी, पुणे ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . याबाबत पोलिस प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले मनसेचे अभय अरुण वाडेकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा संघटक आहेत.  त्यांनी (२७ नोव्हेंबर ) ला प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मनसेच्या सात ते आठ कार्यकर्त्यांसह जाऊन लॉकडाऊन मध्ये शाळेने जास्त फी का आकारली यावरून धमकी दिली.  व त्या प्रकरणी निवेदनही दिले.  ( ५ डिसेंबर) ला अभय वाडेकर यांनी फिर्यादी महेंद्रसिंग यांना भोसरीतील नाना नानी पार्क येथे भेटून शाळेसमोर आंदोलन करून शाळेची बदनामी करण्याची धमकी दिली. शाळेचे बदनामी टाळायचे असेल तर एक लाख रुपये खंडणी दे अशी मागणी केली. त्याच वेळी फिर्यादी यांच्याकडून त्यांनी पाच हजार रुपये घेतले.त्यानंतर पुन्हा ( ७ डिसेंबर ) ला आरोपीने आंबेठाण चौक जवळ महेंद्रसिंग यांच्याकडून पंचवीस हजार रुपये घेतले.  

एकूण ३०  हजार रुपये दिल्यानंतर यापुढे आणखी पैसे देऊ शकणार नसल्याचे फिर्यादी महेंद्रसिंग यांनी सांगितले . मात्र उर्वरित पैसे न दिल्यास मनसेचे वाडेकर यांनी  शाळेच्या बदनामीची धमकी दिली.  व परत पैशांसाठी फिर्यादी सिंग यांना फोन केला.  महेंद्रसिंग यांनी त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेत अभय वाडेकर यांच्या विरोधात तक्रार दिली.  त्यानुसार चाकण पोलिसांत अभय वाडेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला. चाकण पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार पोलिसांनी अभय वाडेकर यांना अटक केली आहे.  याप्रकरणी पुढील तपास पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस