शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कॉपीराईट प्रकरणात दिग्दर्शक रामगोपाल वर्मा औरंगाबादच्या न्यायालयात हजर; दंड भरून अटक वॉरंट केले रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 13:02 IST

चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी गुरुवारी (दि.६) औरंगाबादच्या न्यायालयात ‘कॉपीराईट कायद्यांतर्गत’ दाखल एका दाव्यात हजेरी लावली.

ठळक मुद्देरामगोपाल वर्मा यांनी औरंगाबादच्या न्यायालयात ‘कॉपीराईट कायद्यांतर्गत’ दाखल एका दाव्यात हजेरी लावली. या दाव्याची पुढील सुनावणी २० आॅक्टोबर २०१८ ला होणार आहे.

औरंगाबाद : चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी गुरुवारी (दि.६) औरंगाबादच्यान्यायालयात ‘कॉपीराईट कायद्यांतर्गत’ दाखल एका दाव्यात हजेरी लावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांच्या आदेशानुसार दंडाची रक्कम जमा करून त्यांच्याविरुद्ध जारी केलेले ‘अजामीनपात्र अटक वॉरंट’ रद्द करून घेतले. यापुढील सुनावणीस हजर राहण्याची हमी त्यांनी न्यायालयाला दिली. या दाव्याची पुढील सुनावणी २० आॅक्टोबर २०१८ ला होणार आहे.

काय होते प्रकरण नूतन कॉलनीतील रहिवासी मुश्ताक मोहसीन मुबारक हुसेन (६५) यांनी तक्रार दिली होती. त्यांनी रामगोपाल वर्मा यांच्यावर कथा चोरीचा आरोप केला होता.  तक्रारीनुसार त्यांनी ‘जंगल में मंगल’ नावाची कथा लिहिली होती. त्या कथेवर रामगोपाल वर्मा यांनी ‘अज्ञात’ नावाचा चित्रपट तयार केला. २००९ मध्ये अज्ञात हा चित्रपट प्रदर्शित झाला. तो चित्रपट  तयार करण्यापूर्वी  वर्मा यांनी आपली परवानगी न घेता किंवा ‘कॉपीराईट’चे हक्क न घेता ‘अज्ञात’ चित्रपट तयार केला, असे मुश्ताक यांचे म्हणणे आहे. मुश्ताक यांनी २०१० मध्ये औरंगाबादच्या न्यायालयात वर्मा यांच्याविरुद्ध ‘खाजगी दावा’  दाखल केला होता. वर्मा यांनी कॉपीराईट कायद्याच्या कलम ५१ चा भंग केला. म्हणून त्यांना याच कायद्याच्या कलम ६३ नुसार शिक्षा व्हावी, अशी विनंती मुश्ताक यांनी केली होती.  

या गुन्ह्यात वर्मा यांना जामीन मिळाला होता. वर्मा यांनी १२ जून २०१८ रोजी दाखल केलेला हजेरी माफीचा अर्ज न्यायालयाने नामंजूर करून अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. अज्ञात चित्रपटाची कथा नीलेश गिरकर आणि पुनीत गांधी यांची आहे. त्यांच्याच कथेवर हा चित्रपट तयार केल्याचे रामगोपाल वर्मा यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Ram Gopal Varmaराम गोपाल वर्माCourtन्यायालयAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी