शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राकेश पाटील हत्या प्रकरण : मानेवरचा घावच बेतला जीवावर, आरोपी आले होते हत्येच्या हेतूनेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 01:34 IST

Rakesh Patil murder case News : राकेश पाटील यांची हत्या झाल्यावर नेमकी ही हत्या का आणि कशी झाली, याचे कारण पुढे येत आहे.

 अंबरनाथ : राकेश पाटील यांची हत्या झाल्यावर नेमकी ही हत्या का आणि कशी झाली, याचे कारण पुढे येत आहे. पाटील यांना एका इमारतीच्या ग्रीलचे काम मिळाले होते. मात्र, ते काम डी. मोहन यांना संबंधित बांधकाम व्यावसायिकाने दिले होते. त्यावरून राकेश आणि डी. मोहन यांच्यात वाद झाला आणि त्याच वादातून डी. मोहन याने साथीदारांच्या मदतीने पाटील यांंची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येच्या वेळी राकेश याचा भाऊ आणि त्याचे मित्रही सोबत होते. राकेश यांच्या शरीरावर नऊ वार करण्यात आले असून त्यातील एक घाव हा मानेवर होता. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.अंबरनाथ शिव मंदिर परिसरातील जैनम रेसिडेन्सी या इमारतीच्या आवारात राकेश आणि डी. मोहन यांच्यात वाद झाला होता. राकेश आणि त्यांच्या कुटुंबीयांची जागा एका बिल्डरला विकासासाठी दिली आहे. त्या जागेपासून बाजूलाच नव्या इमारतीचे काम सुरू असून त्याच बिल्डरची जागा असल्याने तेेथील काम संबंधित बांधकाम व्यावसायिकाने राकेश यांना दिले होते, असे फिर्यादीत नमूद केले आहे. मात्र, हे काम करताना डी. मोहन याने संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून परस्पर त्या इमारतीच्या ग्रीलचे काम घेतले होते. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे राकेश आणि त्याचे भाऊ जे काम करत होते, तेच काम डी. मोहन यांनी मिळविल्याने पाटील आणि डी. मोहन यांच्यात वाद झाला. त्यामुळेच डी. मोहन आणि त्यांच्या साथीदारांनी राकेश, त्याचा भाऊ अजय आणि त्याच्या मित्रांवर हल्ला केला.या हल्ल्यात राकेश यालाच लक्ष्य करत धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याला वाचविण्यासाठी त्याचे मित्र आणि भावाने प्रयत्न केला. मात्र, त्यांनी राकेशच्या मानेवर आणि पाठीवर घाव घातल्याने त्याचा मृत्यू झाला. मारेकरी हे गाडीमध्ये शस्त्र घेऊनच आल्याने मारेकऱ्यांचा हेतू हा राकेश यांना मारण्याचाच होता, हे समोर आले आहे. ...ही तर सत्तेची मस्ती : बाळा नांदगावकर यांचा आरोपराकेशची हत्या म्हणजे सत्तेची मस्ती आहे. हल्लेखोरांसोबत हत्येचा कट रचणारे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही हत्या ठरवून केली आहे. पोलीस आयुक्तांकडे यासंदर्भात वास्तव मांडून आरोपींवर कारवाईची मागणी करणार असल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. नांदगावकर, आमदार राजू पाटील यांनी शुक्रवारी राकेश यांच्या कुटुंबाची भेट घेतली. ही हत्या करून गावात दहशत माजविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. योग्यवेळी उत्तर दिले जाईल, असा इशारा नांदगावकर यांनी दिला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोबाइलवर पाटील यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करुन त्यांना सांत्वन दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीambernathअंबरनाथ