शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

PMC बँक घोटाळाप्रकरणी एचडीआयएलचे राकेश आणि सारंग वाधवानला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 18:14 IST

आज सकाळपासून दोघांकडे आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु होती.

ठळक मुद्देचौकशीमध्ये त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई अन्य आरोपींचा शोध सुरु आज पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी एचडीआयएलचे राकेश आणि सारंग वाधवानला अटक करण्यात आली आहे.

मुंबई - पीएमसी बँकप्रकरणी मुंबई पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरबीआयच्या प्रशासक यांच्या आदेशावरून जसबीर सिंग मठ्ठा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आर्थिक गुन्हे विभागाकडे (ईओडब्ल्यू) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार आज पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी एचडीआयएलचे राकेश आणि सारंग वाधवानला अटक करण्यात आली आहे.आज सकाळपासून दोघांकडे आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु होती. चौकशीमध्ये त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त राजवर्धन यांनी दिली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरु असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. मठ्ठा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पीएमसी या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस आणि अध्यक्ष वरियम सिंग आणि बँकेचे इतर पदाधिकारी तसेच एचडीआयएल कंपनीचा संचालक वाढवा यांनी २००८ ते २०९ या कालावधीत पीएमसी बँक, भांडुप (प.) या बँकेतील ठराविक कंपन्यांची मोठी कर्ज खाती ज्यामध्ये कर्ज परतफेड होत नसल्याने अनुत्पादक कर्ज (एनपीए) झाली असतानाही त्यांना अनुत्पादक कर्ज घोषित केले नाही आणि त्यांनी ही माहिती जाणीवपूर्वक आरबीआयपासून लपवून ठेवली आणि कमी कर्ज रक्कमेच्या बनावट कर्ज खात्यांचा बँकेचा खोटा व बनावट अभिलेख तयार करून आरबीआयला माहिती सादर केली. त्यामुळे बँकेला ४३५५.४६ कोटी रक्कमेचे नुकसान झाल्याचे आढळून आले आणि हा गैरप्रकार झाल्याचे उघड झाले. गैरव्यवहाराचे रक्कमेमध्ये आणि मोठ्या कर्जप्रकरणांपैकी प्रमुख कर्जदार आरोपी असलेली कंपनी हौसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. ग्रुप ऑफ कंपनीज असून त्यांनी बँकेच्या पदाधिकारी यांच्याशी संगनमत करून बेकायदेशीररित्या कर्ज प्राप्त करून घेतले आणि परतफेड देखील केली नाही. 

टॅग्स :ArrestअटकPMC Bankपीएमसी बँकEconomic Offence Wingआर्थिक गुन्हे शाखाPoliceपोलिस