शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

दलित मुलीच्या वरातीवर दगडफेक; MP सरकारने हल्लेखोरांच्या घरावर चालवला बुलडोझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 14:20 IST

Pelted stones on dalit daughter barat : संतप्त झालेल्या वऱ्हाडींनी झिरापूर पोलीस स्टेशनमध्ये हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

राजगड :  मध्य प्रदेशातील राजगडमध्ये गुरुवारी एका दलित मुलीच्या लग्नाच्या वरातीवर दगडफेक करणाऱ्या बदमाशांच्या बेकायदेशीर घरांवर बुलडोझर फिरवला. ही घटना जिरापूरमध्ये मंगळवारी रात्री घडली. वरात मशिदीसमोरून बँडबाजा वाजवत जात असताना जवळपास २५ हल्लेखोरांनी दगडफेक केली होती. या दगडफेकीत चार लग्न वराती आणि एक मुलगी जखमी झाली. यानंतर संतप्त झालेल्या वऱ्हाडींनी झिरापूर पोलीस स्टेशनमध्ये हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.जिरापूरच्या माताजी वस्तीत राहणारे मदन मालवीय यांची मुलगी अंजूच्या लग्नाची वरात सुसनेरहून आली होती. रात्री अकराच्या सुमारास मशिदीसमोरून वरात बँड-बाजासह निघत होती. दरम्यान, तेथे उभ्या असलेल्या काही समाजकंटकांनी बँड बाजावाल्यांना बँड वाजवणे बंद करण्यास सांगितले. यानंतर बँडवाल्याने मशिदीसमोर बँड बंद केला. यानंतर वराती शीतला माता मंदिराच्या मागील बाजूस पोहोचले आणि त्यांनी पुन्हा बँडबाजा सुरू केला.अशी घटना बँडबाजा सुरू होताच मागून काही समाजकंटक आले आणि शिवीगाळ करत विटा, दगड फेकण्यास सुरुवात केली. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच जिरापूर मचलपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जिरापूर मचलपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रभात गौर यांनी जखमींना रुग्णालयात नेले व दगडफेक करणाऱ्यांना पोलीस ठाण्यात आणले. मिळालेल्या माहितीनुसार, या दगडफेकीत एक तरुण अधिक जखमी झाला आहे. त्याला राजगड येथे रेफर करण्यात आले आहे. येथे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अशी माहिती पोलिसांनी दिलीही वरात सुसनेरहून येत होती, अशी माहिती पोलिस स्टेशनचे प्रभारी प्रभात गौर यांनी दिली. या वरातीसंदर्भात मुलीचे वडील सुरेश चौहान जिरापूरला पोहोचले होते. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अल्पसंख्याक समाजातील सुमारे २५ लोकांनी बँड वाल्यांसह वरतीत मारहाण केली. या हल्ल्यात काही वराती जखमी झाले.

टॅग्स :stone peltingदगडफेकmarriageलग्नPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश