शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

राजा रघुवंशीच्या हत्येचे ५ गुन्हेगार...; ३ राज्यातल्या पोलिसांना १७ दिवस चकवा दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:08 IST

राजा आणि सोनम हनीमूनसाठी शिलांगला गेले होते. त्याठिकाणी सुपारी किलर्सने राजाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह दरीत फेकला.

मध्य प्रदेशातील राजा रघुवंशी हत्याकांडाचे कोडे पोलिसांनी सोडवले आहे. या प्रकरणाचं गूढ उकलण्यासाठी ३ राज्यातील पोलिसांनी दिवसरात्र एक केली. १७ दिवस मेघालय आणि मध्य प्रदेशातील पोलीस या घटनेचा तपास करत होते. अखेर पोलिसांनी राजाच्या हत्येचे रहस्य उलगडले. राजाच्या मृत्यूमागे त्याची पत्नी सोनमच मास्टरमाईंड असल्याचे पोलिसांनी म्हटलं. त्याशिवाय या हत्याकांडातील अन्य ४ आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे.

राजा आणि सोनम हनीमूनसाठी शिलांगला गेले होते. त्याठिकाणी सुपारी किलर्सने राजाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह दरीत फेकला. राजाचा मृतदेह २ जून रोजी पोलिसांना सापडला. तो पूर्ण सडलेल्या अवस्थेत होता परंतु कुटुंबाने त्याची ओळख पटवली. सोनमनेच त्याचा प्रियकर राज कुशवाह याच्यासोबत मिळून राजाची हत्या केली असं मेघालय पोलिसांनी सांगितले. मेघालय पोलीस अधिकारी विवेक यांनी सांगितले की, सोनमसोबत ४ अन्य आरोपींना अटक केली आहे. सर्वात आधी आकाश राजपूत याला अटक केली. ज्याचे वय १९ वर्ष आहे. तो ललितपूरचा रहिवासी आहे. अन्य आरोपींमध्ये विशाल सिंह चौहान, राज सिंह कुशवाह यांचा समावेश आहे. दोघेही इंदूरमधील आहेत. राजचे वय २१ असून तो सोनमला बॉयफ्रेंड असल्याचे बोलले जाते.

आनंद कुर्मीने केला पहिला हल्ला

या प्रकरणी आनंद कुर्मीला अटक करण्यात आली आहे. सर्वात आधी राजावर हल्ला आनंद कुर्मी यानेच केला होता. सोनमचा शोध सातत्याने पोलीस घेत होती आणि तिलाही अटक करण्यात आली आहे. मेघालय पोलिसांची एक टीम गाजीपूरला रवाना झाली असून ती सोनमला ताब्यात घेईल. २३ मे रोजी ही घटना घडली. सुरुवातीला राजा आणि सोनम दोघेही गायब असल्याने हे हत्येचे प्रकरण मानले गेले नाही. बेपत्ता जोडप्याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत होते. परंतु २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला आणि त्यात नवा खुलासा समोर आला. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विशेष तपास पथक नेमण्यात आले.

सोनम तब्बल १७ दिवस बेपत्ता होती. अखेर ८ जून रोजी ती उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील एका ढाब्यावर अत्यंत अस्वस्थ अवस्थेत आढळली. तिने स्थानिक पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत खळबळजनक कबुली दिली की, तिनेच पतीच्या हत्येसाठी भाडोत्री गुंडांना सुपारी दिली होती. या धक्कादायक ट्विस्टने संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी