शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

Sonam Raghuvanshi news: हमराज मुव्हीची स्टोरी अन् शिलाँगला निघण्यापूर्वी राजाचे व स्वत:चे केलेले वजन; राजाच्या भावाचा सोनमबाबत मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:50 IST

Sonam Raghuvanshi news: शिलाँगला हनिमूनसाठी जाण्यापूर्वी सोनमने राजाचे आणि तिचे वजन तपासले होते. राजाचे वजन ६५ किलो होते, तर सोनमचे त्याच्यापेक्षा चार-पाच किलो जास्त भरले होते.

आजपासून सुमारे २३ वर्षांपूर्वी म्हणजेच २००२ मध्ये हमराज नावाचा एक सिनेमा आलेला. त्यात अक्षय खन्ना जो करण म्हणून अभिनय केला होता त्याने त्यांच्याच एका स्पर्धकाचा खून केला होता. पोलिसांना मृतदेहच न सापडल्याने ती हत्या मानली जात नव्हती. पोलिसांना तो अपघात वाटत होता. या मुव्हीवरूनच सोनम आणि राजने राजा रघुवंशीच्या हत्येचा प्लॅन आखल्याचा दावा राजाच्या भावाने विपिन रघुवंशीने केला आहे. 

शिलाँगला हनिमूनसाठी जाण्यापूर्वी सोनमने राजाचे आणि तिचे वजन तपासले होते. राजाचे वजन ६५ किलो होते, तर सोनमचे त्याच्यापेक्षा चार-पाच किलो जास्त भरले होते. राजाला ती एकटीनेच दरीत ढकलता येईल का याचा अंदाज घेत होती, असा दावा राजाच्या भावाने केला आहे. हमराज सिनेमाच्या धर्तीवर तिने राजाला मारण्याचा प्लॅन बनविला होता, असे त्याने सांगितले. 

दरम्यान, सोनमचा भाऊ गोविंदने आज राजाच्या कुटुंबीयाची भेट घेतली. रडतच तो घरात दाखल झाला. राजाच्या आईचे पाय पकडले आणि ओक्साबोक्शी रडू लागला. आता तुम्ही काही करू नका, मीच सोनमला फाशीची शिक्षा देईन असे त्याने सांगितले. वकीलही मीच पाहणार आहे. तसेच सोनम आणि राज यांचे काही प्रेमसंबंध नव्हते. जे सांगितले जातेय ते खोटे आहे. ती त्याला राखी बांधायची आणि तो तिला ताई म्हणायचा. आम्हाला जर आधीच माहिती असते तर तिचे लग्न का लावून दिले असते. इथपर्यंत गोष्ट गेलीच नसती. राजा माझा प्रिय होता, मी आजपासून त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेणार असल्याचे गोविंदने सांगितले. 

सोनमने आपणच राजाची हत्या केल्याचे मेघालय पोलिसांकडे कबुल केल्याचे वृत्त येत आहे. हनीमूनच्या बहाण्याने सोनमने राजाला सोहराच्या निर्जनस्थळी नेले आणि इतर आरोपींना तिथले लोकेशन पाठवले. त्यानंतर सासूला अपरा एकादशीचा उपवास केल्याचे सोनमने खोटे सांगितले ते हॉटेलच्या रेकॉर्डमधून तिने जेवण केल्याचे समोर आले. हत्येनंतर सोनमने राजाच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून सात जन्मो का साथ ही पोस्ट पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी केली. पोलिसांना गुवाहाटी रेल्वे स्टेशनजवळ हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश