शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Raja Raghuvanshi and Sonam: हनिमूनला गेलेल्या राजा आणि सोनमचा पोलिसांना मिळाला सीसीटीव्ही व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:11 IST

Raja Raghuvanshi and Sonam Latest News: हनिमूनसाठी मेघालयातील शिलाँगला गेलेले इंदौरचे राजा रघुवंशी आणि सोनम हे जोडपे बेपत्ता झाले. शिलाँग पोलिसांना दोघांचा एक सीसीटीव्ही मिळाला आहे.

Raja Raghuvanshi and Sonam News: राजा रघुवंशी आणि सोनम हे जोडपे हनिमूनसाठी शिलाँगला गेले. पण, २३ मे रोजी ते बेपत्ता झाले. हे प्रकरण समोर आल्यानंतर खळबळ उडाली. २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. मात्र, सोनम अजूनही बेपत्ता आहे. दरम्यान, तपास करत असलेल्या शिलाँगला पोलिसांच्या हाती एक व्हिडीओ लागला आहे. या व्हिडीओमध्ये राजा रघुवंशी आणि सोनम हे दोघे हॉटेलमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राजा रघुवंशी आणि सोनम प्रकरणातील गुढ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला आहे. त्याच्या मृतदेहाशेजारी सोनमचा शर्ट पोलिसांना मिळाले. पण, सोनमबद्दल अजूनही काही समोर आलेले नाही. 

शिलाँगमधील हॉटेलमधील व्हिडीओ

या प्रकरणाचा तपास करत असताना शिलाँग पोलिसांना एक व्हिडीओ मिळाला आहे. हा व्हिडीओ शिलाँगमधील एका हॉटेलमधील आहे, जिथे राजा रघुवंशी आणि सोनम थांबलेले होते. हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात राजा रघुवंशी आणि सोनम हॉटेलमध्ये जाताना दिसत आहे. राजा आणि सोनम हॉटेलमधून बाहेर पडल्यावर कुठे गेले आणि त्यांच्यासोबत नेमक काय झाले, याचा व्हिडीओच्या आधाराने पोलीस शोध घेत आहेत.

वाचा >>उपचारासाठी बलात्कार पीडितेच्या घरी गेलेल्या डॉक्टरला तालिबानी शिक्षा; फरफटत नेले अन्...

पूर्व खासी हिल्सचे पोलीस अधीक्षक विवेक सीएम यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. हा व्हिडीओ या प्रकरणाचा उलगडा करण्यात महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. 

रात्री मुक्काम केला अन्...

२१ मे रोजी मेघालयातील शिलाँगला पोहोचल्यानंतर राजा रघुवंशी आणि सोनम हे जोडपे २२ मे रोजी दुचाकी भाड्याने घेऊन फिरायला गेले होते. ते मावलखियाट गावात पोहोचले होते. तिथून ते ३००० पायऱ्या चढून नोंग्रियाट गावातील लिव्हिंग रुट्स पूल बघायला गेले होते. 

दोघांनी नोंग्रियाटमधील शिपारामध्ये मुक्काम केला आणि २३ मे रोजी सकाळी ते परत निघाले होते. तेव्हापासून ते बेपत्ता झाले. २४ मे रोजी शिलाँग सोहरा मार्गावरील सोहरारिममधील एका कॅफे बाहेर त्यांची दुचाकी बेवारस अवस्थेत आढळून आली होती. 

राजा रघुवंशाची सापडला मृतदेह

या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दोघांचा शोध घेण्यास सुरूवात केली. २ जून रोजी मेघालय पोलिसांना वेईसावडाँग धबधब्याजवळील एका दरीत राजा रघुवंशीचा मृतदेह मिळाला. हातावर राजा असे लिहिलेले असल्यामुळे त्याची ओळख पटली. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये राजाची हत्या धारदार शस्त्राने केली असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcctvसीसीटीव्हीPoliceपोलिस