झारखंडमधील पलामू येथे राजा रघुवंशी सारखी हत्या उघडकीस आली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या एका तरुणीने तिच्या प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मुलीला तिच्या प्रियकरासोबत लग्न करायचे होते, परंतु तिच्या कुटुंबाने तिचे लग्न दुसऱ्या कोणाशी तरी लावून दिले. दीड महिन्यांपूर्वी लग्न झाल्यानंतर, मुलीने तिच्या प्रियकरासोबत मिळून तिच्या पतीला मारण्याचा कट रचला आणि ३१ जुलै रोजी त्याला संपवले. पोलिसांनी आता या प्रकरणाचा उलगडा केला आहे.
दीड महिन्यापूर्वी झालेले लग्न!या प्रकरणाची माहिती देताना पलामूच्या पोलीस अधीक्षक रेश्मा रमेशन म्हणाल्या की, ही तरुणी पलामूच्या नवजयपूर पोलिस स्टेशन परिसरातील सिंजो येथील रहिवासी आहे. तिचे लग्न २२ जून रोजी सरफराज नावाच्या मुलाशी झाले होते. परंतु, लग्नानंतर दोघेही वेगळे राहत होते. पोलिसांनी सांगितले की, आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराने पती सरफराजला जंगलात भेटायला बोलावले होते. फसवून जंगलात बोलावल्यानंतर पत्नी आणि तिच्या प्रियकराने दगडांनी ठेचून त्याची हत्या केली. पतीच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे.
कपटाने बोलावले आणि दगडांनी चिरडून मारले!एसपी रेश्मा रमेशन यांनी सांगितले की, या तरुणीने तिच्या प्रियकराच्या मदतीने तिच्या पतीची हत्या केली. माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, लातेहार जिल्ह्यातील मुफस्सिल पोलीस स्टेशन परिसरातील दही गावातील रहिवासी सरफराज खानची दगडांनी ठेचून हत्या करण्यात आली आणि मृतदेह जंगलात फेकल्यानंतर पानांनी झाकण्यात आला. एसपी म्हणाले की, चौकशी दरम्याने मुलीने तिच्या प्रियकराशी लग्न करायचे असल्याचे आणि तिने तिच्या पतीला मारण्याचा कट रचल्याचे उघड केले. आता मुलीच्या प्रियकराला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा खुलासा करताना एसपींनी सांगितले की, मुलीचे दीड महिन्यांपूर्वी दुसऱ्या मुलाशी लग्न झाले होते. त्यानंतरही तिला तिच्या प्रियकराशी लग्न करायचे होते. प्रियकराशी लग्न करण्यासाठी मुलीने तिच्या पतीला मारण्याचा कट रचला आणि त्याला जंगलात बोलावले आणि दगडांनी ठेचून त्याची हत्या केली. पोलीस आरोपी प्रियकराचाही शोध घेत आहेत.